Summer Season Disease : हवामानातील बदलाने मनमाडला रुग्णांच्या संख्येत वाढ

ताप, सर्दी, खोकला, अंगदुखीने छोटे दवाखाने फुल्ल
Summer Season Disease
Summer Season Diseaseesakal
Updated on

Summer Season Disease : सध्या उन्हाळा ऋतू सुरू असला तरी वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी ऊन, वादळी वारा, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे मनमाड शहरात संसर्गजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

लहान मुलांसह ज्येष्ठांना ताप, थंडी, डोकेदुखी, अंगदुखीचा सामना करावा लागत असल्यामुळे दवाखान्यात रुग्णांची उपचारासाठी गर्दी वाढत आहे. (Summer Season Disease Increase in number of patients due to change in climate nashik news)

उन्हाळा सुरू झाल्याने कडक उन्ह जाणवू लागले आहे. मात्र त्यात ढगाळ वातावरण आणि दमट हवामान या सर्वांमुळे वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. वातावरणातील या बदलांचा परिणाम थेट आरोग्यावर होत आहे.

ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशा विविध कारणांमुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच आजारी पडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनमाड शहरात सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी या आजारांमध्ये वाढ होत आहे.

बदलते वातावरण, ढगाळ हवामान, सकाळी व संध्याकाळी थंड वारे, तर दुपारी कडक उन्हामुळे संसर्गजन्य आजारांनी डोकेवर काढले आहे. खासकरून ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीच्या तक्रारी असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Summer Season Disease
Summer Season : खारघरच्या पार्श्वभूमीवर पहिनेत ZP अलर्ट! उष्माघाताचा धोका बघता आरोग्य पथक

व्हायरल इन्फेक्शन असलेल्या रुग्णांमध्ये शिंक येणे, नाक वाहणे आणि डोळे जळजळणे ही लक्षणे दिसत आहेत.

"सध्याचे वातावरण हे विविध आजारांना आमंत्रण देणारे आहे. योग्य काळजी न घेतल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. कडक उन्हामुळे आरोग्यास अपायकारक स्थिती निर्माण झाली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकच नाही, तर सर्वच वयोगटातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. नाकातोंडावर मास्क लावणे, नियमित हात स्वच्छ धुणे ,सकस आहार घेणे ,जास्तीत जास्त पाणी पीत राहणे सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे तसेच लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे." - डॉ.मोहन वारके, अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय

Summer Season Disease
Summer Season : उन्हाचा कडाक्यासोबत श्‍वसनाच्या त्रासाने मृत्यूचे प्रमाणही वाढले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.