तापमान घसरल्याने दिलासा मात्र खंडीत विजपुरवठ्यामुळे संताप

Electricity
Electricityesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील तापमानात मंगळवारी (ता.५) प्रथमच किंचितसी घसरण झाली. तब्बल पाच दिवसानंतर प्रथमच पारा ४३ अंशाच्या खाली आला. आज शहरात ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. घसरलेल्या तापमानाने शहरवासियांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी खंडीत वीजपुरवठ्यामुळे (Disrupted power supply) शहरवासिय हवालदिल झाले होते. रमजान (Ramzan) पर्व व त्यातच सोमवारी (ता.४) या हंगामातील सर्वाधिक विक्रमी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असताना काल रात्री साडेनऊला वीजपुरवठा खंडीत झाला. मध्यरात्री दोनच्या सुमारास पुरवठा सुरळीत झाला. उकाड्यामुळे अनेकांनी अर्धी रात्र जागून काढली.

शहरात तब्बल साडेचार ते पाच तास वीज पुरवठा खंडीत असल्यामुळे अनेक जण खासगी वीज कंपनीला शिव्यांची लाखोली वाहत होते. दरम्यान वाढत्या तापमानामुळे पंखे, कुलर, फ्रीज, माठ, एसी आदींच्या विक्रीत काहीशी वाढ झाली आहे. शहरात जागोजागी शीतपेय (Cold drinks) विक्रेत्यांबरोबरच विविध रंगी माठ विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. शहरात ३१ मार्चपासून सातत्याने ४३ अंश सेल्सिअसहून अधिक तापमान होते. ३० मार्चपुर्वी ४० ते ४१ अंश सेल्सिअस तापमान होते. ३१ मार्चपासून तापमानाने अचानक उसळी घेतली होती.

Electricity
आजपासून पुढील चार दिवस नाशिकात उष्णतेची लाट तापमान @ ३९.४

रमजान पर्वामुळे मुळातच शहरातील पुर्व भागात मुस्लीम बांधवांचे रोजे उपवास असतात. या काळात महत्वाची कामे वगळता प्रामुख्याने आराम करणे व सायंकाळी रोजा अफ्तारीनंतर कामे करण्यास प्राधान्य दिले जाते. यामुळे दुपारी रस्त्यावर काहीसा शुकशुकाटच होता. डेअरीवर दुध, दही, ताक, लस्सी आदी पदार्थांची विक्री वाढलेली दिसून आली. शहरातील प्रसिध्द मसाला ताक विक्रेते व रसवंतीगृह चालकांच्या व्यवसायात वृध्दी झाली आहे. वाढत्या तापमानामुळे चारचाकी हातगाडीवर यंत्र व जनरेटर (Generator) थाटून गल्लोगल्ली ऊसाचा रस विक्री करणाऱ्या हातगाड्याही दिसून येत आहेत. घरपोच उसाचा रस व नारळपाणी विक्री करणाऱ्यांचा यामुळे चांगला व्यवसाय होत आहे. विविध सभा, समारंभ व लग्न सोहळ्यांमध्ये अन्य मेनू काही असो पण तापमान लक्षात घेता मठ्ठा-ताक हमखास ठेवले जात आहे.

Electricity
अवकाळी पाऊस अन् गारपीटीचा शेतीला मोठा फटका; पाहा Photos

शहरातील संगमेश्वर ३३ केव्ही व ११ केव्ही या दोन मुख्य वीजवाहिणीत फाॅल्ट झाल्याने पुरवठा खंडीत झाला होता. फाॅल्ट दोन वेगवेगळ्या टोकाला असल्याने दुरुस्तीसाठी वेळ लागल्याचे मालेगाव पाॅवर सप्लाय लि. (MPSL) च्या तांत्रिक विभागाने सकाळ ला सांगितले.

३० मार्चपासून शहरातील तापमानाची स्थिती (अंश सेल्सिअस मध्ये)

३० मार्च - ४१

३१ मार्च - ४३.४

१ एप्रिल - ४३

२ एप्रिल- ४३.२

३ एप्रिल - ४३

४ एप्रिल - ४३.६

५ एप्रिल - ४२.४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()