Summer Temperature : इगतपुरी तालुक्यात पारा पोचला 40 अंशावर; उन्हाच्या तीव्रतेने रस्ते ओस

Due to the increase in heat in various parts of the taluk, there is a dry spell in the afternoon in the urban and always busy areas
Due to the increase in heat in various parts of the taluk, there is a dry spell in the afternoon in the urban and always busy areasesakal
Updated on

Summer Temperature : थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण म्हणून इगतपुरीची ओळख आहे. मात्र दर वर्षी वाढत जाणाऱ्या तापमानामुळे ही ओळख आता धुसर होत चालल्याचा अनुभव इगतपुरीवासियांना येत आहे.

गुरुवारी (ता. ११) शुक्रवारी (ता. १२) पुन्हा एकदा उन्हाचा चटका घोटी, इगतपुरी व कसारा घाट परिसरातील नागरिकांना सहन करावा लागला आहे. दिवसभर तीव्र सूर्य किरणांपासून बचाव करताना नागरिकांची दमछाक होत आहे.

रस्ते प्रचंड उन्हाने तापत असल्याने रस्त्यावरून प्रवास करताना उन्हाच्या झळा लोकांना भाजून काढत आहेत. सकाळी नऊपासूनच उन्हाचा तडाखा बसत असून संध्याकाळी साडेसहापर्यंत गरम झळा लोकांना त्रासदायक ठरत आहेत. (Summer Temperature Mercury reached 40 degrees in Igatpuri Taluka nashik news)

हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविलेली असताना आगामी काही दिवस अशाच स्वरूपात उन्हाचा तडाखा कायम राहाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे.

मे महिना मध्यावर आला आणि उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात जाणवते आहे. रोज कडक ऊन पडत असल्याने दिवसा जनजीवन प्रभावित होत आहे. सायंकाळी ऊन उतरल्यानंतरच ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Due to the increase in heat in various parts of the taluk, there is a dry spell in the afternoon in the urban and always busy areas
Market Committee Election : बाजार समित्यांच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर

शहरातील प्रमुख बाजारपेठा व रस्त्यावर वर्दळ घटली आहे. कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांकडून उपरणे, टोपी, रुमाल आदींच्या माध्यमातून सूर्य किरणांपासून बचाव करीत आहे.

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत पाऱ्यात आणखी वाढ होऊन उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना आरोग्य सांभाळणे आवश्यक झाले आहे. उन्हाच्या तीव्रतेने दुपारी रस्ते ओस पडू लागले असून बाजारपेठेवरही उन्हाचा परिणाम जाणवू लागला आहे.

Due to the increase in heat in various parts of the taluk, there is a dry spell in the afternoon in the urban and always busy areas
Nashik Agriculture News : बळीराजाच्या मशागतीवर ‘कॅटल इग्रेट’ चा वॉच! बगळ्यांची ट्रॅक्टरमागे गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.