Summer Holiday : उन्हाळी सुट्टीमुळे पर्यटनाला चालना

Tourists
Touristsesakal
Updated on

सोयगाव (जि. नाशिक) : उन्हाळी सुट्टी (Summer vacation) आणि सलग आलेल्या विकेंड सुट्ट्यांमुळे राज्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर (tourism Places) पर्यटकांनी (Tourists) मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना पर्यटकांची पसंती मिळत आहे. राज्यभरातून दाखल झालेल्या पर्यटकांमुळे गर्दी वाढली आहे. (Summer vacation boosts tourism Nashik tourism News)

राज्याच्या सिमेलगत असलेल्या सापुतारा येथे बोटिंगचा आनंद मनमुराद पर्यटक मंडळी घेताना दिसतायत. गेल्या दोन वर्षेपासून कोरोनामुळे घातलेले निर्बंध उठल्यानंतर आता पर्यटकांनी या थंडगार हवेच्या ठिकाणालाही पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेकांनी लाडक्या कोकणाला पसंती दिली आहे. आठवडाभराच्या कालावधीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची (MTDC) सर्व रिसॉर्ट आणि खासगी हॉटेल फुल झाली आहेत.

Tourists
Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात 6 शेळ्या ठार

नाशिक जिल्ह्यातील पर्यटक मुंबई, पुणे, महाबळेश्‍वर, कोकण, गोवा आदी भागांना पसंती देतात. यंदाची उन्हाळी सुट्टी प्राथमिक व माध्यमिक शाळांना १३ जूनपर्यंत सुट्टी असल्याने अनेक कुटुंब पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. कोरोना महामारीच्या लॉकडाऊन उठल्यानंतर उन्हाळी सुट्टीमुळे पर्यटकांची आवक वाढल्याने सर्वच पर्यटनस्थळावर गर्दी तर झालीच होती. पण, पर्यटकांच्या चारचाकी, मोठ्या ट्रॅव्हल्ससारख्या वाहनांच्या गर्दीने रस्ते तासंतास ट्राफिक जाम होऊ लागले आहेत. नाशिक जिल्ह्यासह लगतची सर्वच पर्यटनस्थळे पर्यंटकानी गजबजून गेली आहेत.

समुद्र किनारा, थंड हवेच्या ठिकाणांना पसंती

गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे राज्यभरात कडक निर्बंध लागू होते. मात्र, यावर्षी ते शिथील करण्यात आल्याने अनेकांनी दिवाळी सुट्टीचा फायदा घेत कुटुंबीयांसमवेत समुद्र किनारा असल्येल्या कोकण, गोवा याबरोबरच महाबळेश्‍वर, लोणावळा, खंडाळा, पाचगणी, माथेरान, तोरणमाळ अशा ठिकाणी पर्यटनाला जाण्यास पसंती दिली आहे.

"कोरोनामुळे दोन वर्षापासून मी व माझे कुटुंब कुठेच पर्यटनाला गेले नाही. यावर्षी नियम शिथील झाल्यामुळे आम्ही कुटुंबियांसमवेत कोकण पर्यटनासाठी आलो आहोत. कुटुंबियांना देखील आनंद झाला." - अनिल सोळुंखे, पर्यटक

"उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी कुटुंबीयांसोबत गुजरात ट्रिप काढली. सुट्टीचा पुरेपूर आनंद लुटला. कुटुंबियांना यातून आनंद मिळाला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्बंध होते. मात्र, यंदा निर्बंध शिथिल झाल्याने सहकुटुंब पर्यटनासाठी गेलो. "- ज्योती भुसे, पर्यटक, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.