Sunil Tatkare : धर्मनिरपेक्षता अन् विकासाच्या मुद्द्यावर सत्तेत : सुनील तटकरे

Sunil Tatkare News
Sunil Tatkare Newsesakal
Updated on

Sunil Tatkare : धर्मनिरपेक्षता विचारधारेची फारकत घेणार नाही आणि विकासकामे मार्गी लागावीत, या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत सहभागी झाला आहे, असा निर्वाळा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज येथे दिला. त्याचवेळी २०१४ मध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवण्याची चर्चा होती.

मात्र आपण नाइलाजाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. प्रफुल्ल पटेल आणि मी २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. (Sunil Tatkare statement In power on issue of secularism and development nashik news)

२०१७ मध्ये सरकारमध्ये सहभागी होण्याची, मंत्रिमंडळाची यादी, पालकमंत्री यादी तयार असताना सरकारमध्ये सहभागी झालो नाही. त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा निर्णय आता घेतलेला नाही, असेही स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले.

राष्ट्रवादी भवनामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या मेळाव्यात तटकरे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, सरोज आहिरे, ॲड. माणिकराव कोकाटे, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, विष्णूपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा योगिता आहेर, युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे आदी उपस्थित होते.

‘त्या’वेळी वेगळे राहिले असते चित्र

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना सांभाळती आली नसताना, शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडले होते. त्या वेळी राष्ट्रवादीने निर्णय घेतला असता, तर सत्तेत प्रवेश झाला असता, असे सांगून तटकरे यांनी आता सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय एकट्या अजित पवार यांनी घेतला नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर काँग्रेसने सर्वाधिक टीका राष्ट्रवादीवर केली.

मात्र राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून आपण काँग्रेससोबत जाण्याचे ठरवले. एवढेच नव्हे, तर २००४ मध्ये सर्वाधिक जागा असतानाही राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही. खरे म्हणजे, त्या वेळी अजित पवार हे मुख्यमंत्री झाले असते, तर राज्यात पुढे राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली असती. २००९ मध्ये सत्तेत आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला संपवण्याचा विडा उचलला होता. राष्ट्रवादीविरुद्ध आरोप करण्यासाठी त्यांनी विरोधकांना माहिती पुरविण्याचे काम केले.

Sunil Tatkare News
Sunil Tatkare : इतर राज्यातील आमदारही आमच्याच सोबत आहेत; अजित पवार गटाचा दावा

शरद पवारांचा नामोल्लेख टाळत टीका

पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा नामोल्लेख न करता तटकरे आणि भुजबळ यांनी टीका केली. नेतृत्वावर नव्हे, तर कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या बळावर राष्ट्रवादीचे आमदार होतात, असे तटकरे यांनी सांगितले. भुजबळ म्हणाले, की तुम्ही दाखवलेल्या रस्त्यांनी आम्ही निघालो आहोत. आता रागवण्याचे, दुःख करण्याचे कारण नाही. काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर माझ्या घरी राष्ट्रवादीची स्थापना झाली.

समीर भुजबळ यांनी प्रतिज्ञापत्र आणले. त्यामुळे तुम्ही संस्थापक अध्यक्ष असला, तरी आम्ही संस्थापक कार्यकर्ते आहोत. आमचं तुमच्यावर प्रेम आहे. मात्र कार्यकर्ते अजित पवार यांच्यासोबत आहेत. तुम्ही दिलेला शब्द घेऊन अजित पवार गेले होते.

अजित पवार यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. आता अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून नऊ आमदार निवडून आणावे लागतील. त्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री झाल्यावर त्या पहिला हार अजित पवार यांना घालतील.

श्री. म्हैसधुणे, सौ. बलकवडे, सौ. आहेर, अश्‍विनी मोगल, श्री. खैरे, राजाभाऊ डोखळे, माजी आमदार शिवराम झोले यांची भाषणे झाली.

Sunil Tatkare News
Politics News : पर्यटनाच्या कामांत महायुतीकडून ठाकरे गटाची कोंडी; बदलांचे पत्र, फोनमुळे जिल्हा परिषद संभ्रमात

अजित पवार म्हणालेत...

- छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार घेऊन पक्ष पुढे वाटचाल करतोय

- शेतकरी हा आमचा ‘बेस’ आहे, शहरी भागासाठी आम्ही काम केले

- बहुजनांना आणि विविध विभागांना न्याय देण्याची भूमिका घेतल्याचे मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्वातून दिसेल

- टंचाईसदृश्‍य परिस्थितीविषयीचा नवरात्रोत्सव-दसऱ्यानंतर निर्णय घेतला जाईल

- खरीप पिकांच्या विम्याच्या न मिळालेल्या पैशांबद्दल सोमवारी आढावा घेऊन मार्ग काढणार

- अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये खडाजंगी झाली नाही. आम्ही सगळे परिवार म्हणून काम करतोय

- मी नाराज, मी कुठे गेलो अशा गोष्टींवर विश्‍वास ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी हलक्या कानाचे राहू नये

"अर्थ, सहकार विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंबंधी चुकांची पुनर्रावृत्ती न करता कठोर निर्णय घ्यावे लागतील. मी वयाच्या १८ वर्षांचा असताना वडिलांचे निधन झाल्यावर ४० हजार रुपयांचे कर्ज माझ्याकडे आले. त्यामुळे कर्ज फिटत नाही. एकरकमी तडजोड होऊ शकते म्हणून कर्ज परत करावे लागेल. मोठ्यांनासुद्धा कर्ज परत करावे लागेल. त्यातून बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढावे लागेल." - अजित पवार, उपमुख्यमंत्री

Sunil Tatkare News
Chhagan Bhujbal : पोलिसांनी दुर्लक्ष केले असेल तर त्याचा जाब त्यांनी द्यावा : छगन भुजबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.