Super 110 Exam : ‘सुपर 110’ ची परीक्षा आता एक आठवडा पुढे

ZP Nashik latest marathi news
ZP Nashik latest marathi newsesakal
Updated on

Super 110 Exam : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘सुपर ११०’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या निवड परिक्षेच्या अर्ज स्वीकृती तसेच परिक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

त्यानुसार आता ३ जुलै पर्यंत निवड परिक्षेचा अर्ज स्वीकृती केली जाईल तर, ९ जुलै रोजी निवड चाचणी परिक्षा होईल. (Super 110 exam ZP is now week ahead nashik news)

मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सुपर ११० चे सदस्य सचिव यांनी पंचायत समितीच्या सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून कळविले आहे. तसेच मिशन मोडवर तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राचार्य/मुख्याध्यापक/पालक यांना पत्र देऊन कळविले आहे.

गतवर्षी सुपर ५० च्या धर्तीवर यंदाही सुपर ११० हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. यावर्षी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित, अंशतः: अनुदानित विद्यालयातील निवड चाचणी परीक्षेद्वारे जिल्हा परिषदेने विहित केलेल्या निकषानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण सामाजिक प्रवर्गातील व दिव्यांग अशा ११० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ZP Nashik latest marathi news
Agriculture Courses Admission : कृषी अभ्यासक्रमांच्‍या नोंदणीची या तारखेपर्यंत मुदत; जाणुन घ्या वेळापत्रक

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी च्या नियमित अभ्यासक्रमाबरोबर JEE व NEET या व्यावसायिक पात्रता प्रवेश परीक्षांसाठी नि:शुल्क निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून २६ जून पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. २ जुलै रोजी निवड चाचणी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

मात्र, सध्या दहावीचा निकाल लागल्यामुळे ग्रामीण भागातील मुले अकरावीचे प्रवेश तसेच डिप्लोमा अ‍ॅडमिशनसाठी आवश्यक कागदपत्रांच्या नियोजनात व्यस्त आहे. ‘सुपर ११०’ साठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी तसेच अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती.

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी व्हावे या उद्देशाने योग्य ते नियोजन करण्यात यावे याकरिता वेळापत्रकात बदल करून परीक्षेची मुदत सात दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आतापर्यंत ७०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

ZP Nashik latest marathi news
Engineering Admission : अभियांत्रिकीच्‍या नोंदणीची या तारखेपर्यंत मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.