नामपूर : साक्री रस्त्यालगत असणाऱ्या स्मशानभूमीत अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार रविवारी (ता. १९) उघडकीस आला. काळ्या रंगाच्या कापडात अघोरी विद्येसाठी लागणारे साहित्य आढळल्याने खळबळ उडाली.
पोलिसांनी संबंधितांचा शोध घेत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. येथील स्मशानभूमीत लोकसहभागातून झाडांना दगडी ओटे बांधून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.
त्याची पाहणी करण्यासाठी रविवारी (ता. १९) माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण सावंत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कमलाकर सोनवणे, संजय सोनवणे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन अहिरराव, मेघडीप सावंत आदी आले असता अघोरी विद्येचा प्रकार उघडकीस आला. (superstitious Karni material found in cemetery at Nampur Nashik News)
काळ्या कपड्यात सात चंदनाच्या काड्या काळ्या धाग्याने बांधण्यात आणलेल्या होत्या. काही तरुणांच्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रातील चेहऱ्यांना कुंकू, लाल रंग लावण्यात आला होता.
कोहळ्याला टाचणीच्या सहाय्याने टोचण्यात आला होता आणि त्यावर कुंकू लावण्यात आले होते. छायाचित्रांमध्ये असलेले तरुण कोण आहे, हा प्रकार काय आहे, कोणी केला, याचा शोध पोलिस प्रशासनाने लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
"करणीच्या नावाने किंवा एखाद्याचे वाईट व्हावे, या उद्देशाने उतारे टाकण्यात आलेले असतात. परंतु त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे वाईट होत नाही. उतारे टाकणाऱ्या लोकांमध्ये एक प्रकारची विकृती असल्याने अशी कृत्ये केली जातात. त्यामुळे अंधश्रद्धा खतपाणी घालणाऱ्या विकृतींना नागरिकांनी घाबरू नये. या लोकांचा शोध घेऊन पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी."
- नचिकेत कोळपकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ते, मालेगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.