नाशिक : आदिवासी विकास आयुक्तालयातील नाशिक अप्पर आयुक्तालयातील उपायुक्त सुदर्शन नगरे यांचा वाढदिवस कार्यालयात धूमधडाक्यात साजरा केल्यानंतर बजाविण्यात आलेल्या विभागातील दिलेल्या ४२ कर्मचाऱ्यांनी नोटिसांना मंगळवारी (ता.२३) उत्तर दिल्याचे समजते.
मानवतेच्या दृष्टिकोनातून वाढदिवस साजर केल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नाशिक अप्पर आयुक्त संदीप गोलाईत बैठकीनिमित्त नाशिकबाहेर आहेत. त्यामुळे प्राप्त झालेल्या या नोटीसांच्या उत्तरावर नेमकी काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागले आहे. (Support of employees who issued notices Reply to Notices of Tribal Commissionerate Staff Nashik News)
आदिवासी विकास आयुक्तालयातंर्गत नाशिक अप्पर आयुक्तालयातील उपायुक्त सुदर्शन नगरे यांचा वाढदिवस गत आठवड्यात कार्यालयात धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.
यावेळी कर्मचाऱ्यांनी साहेबांची केबिन, टेबल सर्वकाही फुलांनी सजविले होते. एवढेच नाही तर आनंदाच्या भरात साहेबांची खातिरदारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच कोल्ड फायर लावून वाढदिवसाची रंगत वाढविली.
सेलिब्रिटीच्या स्टेज शो सारखा माहोल आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात यावेळी होता. पार्टी बोअम्बरने नगरे यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. सहकाऱ्यांच्या उपस्थितीत बॉस नाव लिहिलेल्या केकचे कटिंगही यावेळी केले.
ठेकेदारांच्या मदतीने हा वाढदिवस साजरा झाल्याची चर्चा होती. सदर झालेला वाढदिवस नगरे यांच्या अंगलट आले. आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांनी याबाबत संबंधित विभागातील कर्मचा-यांना विचारणा करत थेट कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या.
यात कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी नोटिसांना उत्तर दिले आहे. यात प्रामुख्याने कर्मचाऱ्यांनी आपण मानवतेचा दृष्टिकोन ठेवून वाढदिवस साजरा केल्याचे म्हटले असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे नेमके असे उत्तर देण्यासाठी विभागाकडूनच सांगितले गेल्याची चर्चा विभागात आहे. नाशिक अप्पर आयुक्त गोलाईत बैठक घेण्यासाठी नागपूर येथे गेलेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.