Nashik News : भारतीय ज्ञान परंपराधारित शिक्षणक्रम ठरतील प्रभावी : सूरज मांढरे

कुशल मनुष्यबळाच्‍या उपलब्धतेबाबत जगभराचे लक्ष भारताकडे लागून आहे. त्‍यामुळे युवकांचे भविष्य उज्‍ज्‍वल आहे.
Education Commissioner Suraj Mandre speaking at the closing program of the National Conference held at Yashwantrao Chavan Maharashtra Open University on Monday.
Education Commissioner Suraj Mandre speaking at the closing program of the National Conference held at Yashwantrao Chavan Maharashtra Open University on Monday.esakal
Updated on

Nashik News : कुशल मनुष्यबळाच्‍या उपलब्धतेबाबत जगभराचे लक्ष भारताकडे लागून आहे. त्‍यामुळे युवकांचे भविष्य उज्‍ज्‍वल आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वाची भूमिका बजावणार असून, भारतीय ज्ञान परंपरांवर आधारित शिक्षणक्रम प्रभावी ठरतील, असा विश्‍वास शिक्षण आयुक्‍त सूरज मांढरे यांनी सोमवारी (ता.१२) व्‍यक्‍त केला. (Suraj Mandhare statement of Curriculum based on Indian knowledge tradition will be effective nashik news )

यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ येथे विद्यापीठाचे प्रा. राम ताकवले संशोधन केंद्र व शिक्षणशास्त्र विद्याशाखा आणि इंडियन असोसिएशन ऑफ टीचर एज्युकेटर्स (आयएटीई) यांच्यातर्फे आयोजित ५६ व्या राष्ट्रीय परिषदेप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे अध्यक्षस्‍थानी होते.

याप्रसंगी नवीदिल्‍लीतील आयएटीईचे अध्यक्ष प्रा. मोहम्मद मियान, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, माजी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, डॉ. कविता साळुंके, प्रा. बी. आर. कुक्रेती, डॉ. संजीवनी महाले उपस्थित होते. यावेळी डॉ. आशा ठोके यांनी परिषदेचा तीन दिवसाचा अहवाल सादर केला.

Education Commissioner Suraj Mandre speaking at the closing program of the National Conference held at Yashwantrao Chavan Maharashtra Open University on Monday.
Nashik News: चिचोंडी येथे 67 पिशव्यांचे रक्त संकलन; विधायक उपक्रमातून मेजर नारायण मढवई यांना आदरांजली

मांढरे म्‍हणाले, की अशाप्रकारच्या परिषदांमधून विविध ठिकाणाहून आलेल्या मान्यवरांकडून विचारांची देवाण-घेवाण होते. चांगले ज्ञान प्राप्त होत असून, त्‍याचा लाभ शिकवताना विद्यार्थ्यांना होऊ शकतो. विद्यार्थ्याने शिकणे आणि त्यास शिकविणे यातील अंतर कमी होणे गरजेचे आहे. आपण जे शिकवतो ते विद्यार्थ्यांना समजते की नाही, हेदेखील पडताळून, तपासून बघावे.

कुलगुरू डॉ. सोनवणे, प्रा. मोहम्मद मियान यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नवीदिल्‍लीतील डॉ. अनिता रस्तोगी, चंद्रशेखर चक्रधर, अर्पिता कठाणे, डॉ. सुरेंद्र पाटोळे यांनी परिषदेच्या आयोजनाबद्दल अनुभव व्यक्त केले. रेणुका चव्हाण यांनी परिचय, प्रा. शुभांगी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठ व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अनिल कुलकर्णी, डॉ. जयदीप निकम, कुलसचिव दिलीप भरड आदी उपस्थित होते.

९३ शोधप्रबंध सादर

या तीन दिवसीय परिषदेत ९३ शोधप्रबंध सादर झाले. देशभरातून सुमारे अडीचशेहून अधिक सदस्‍य सहभागी झाले होते. विविध शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली होती. परिषदेत उत्तम शोधप्रबंध सादरीकरणासाठी अपराजिता कनोजिया व रूपाली संकपाळ (शिवाजी विद्यापीठ, पुणे) आणि डॉ. अलोककुमार उपाध्याय, लक्ष्मीप्रभा जे. के. (इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली) यांना पाच हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान केले.

Education Commissioner Suraj Mandre speaking at the closing program of the National Conference held at Yashwantrao Chavan Maharashtra Open University on Monday.
Nashik News : आयमा स्वीकृत उपाध्यक्षपदी उमेश कोठावदे; विविध समित्यांच्या चेअरमनच्या नावांचीही घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.