पंचवटी (जि. नाशिक) : चढाई-पकडीचा थरार... गुणांची चाललेली चढाओढ अन् शेवटपर्यंत रंगलेली शर्यत... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटीमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा झाली.
'त्यात सुरगाणा येथील ग्रामीण क्रीडा मंडळाने प्रथम, तर मुखेड येथील युवा फलटण संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. नांदगावच्या श्रीराम कला, क्रीडा मंडळाने तृतीय पारितोषिक पटकावले. (Surgana Rural Sports Board Winner in District Level Sports Competition Nashik News)
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
नेहरू युवा केंद्रातर्फे एमईटी भुजबळ नॉलेज सिटीच्या सहकार्याने या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या. स्पर्धेत राहुल जाधव यांनी उत्कृष्ट खेळाडू, महेश रोकडे यांनी उत्कृष्ट प्रकड, तर किरण जाधव यांनी उत्कृष्ट चढाईचा मान पटकावला.
ही स्पर्धा जिल्हा युवा अधिकारी कमल त्रिपाठी, मेट भुजबळ नॉलेज सिटीचे प्रशासकीय पदाधिकारी व राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी मोहम्मद आरिफखान, लेखा व कार्यक्रम सहाय्यक सुनील पंजे यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या.
चंद्रकात ढिकले, लता ढिकले, संतोष मते, प्रशांत ढिकले, केशव ढिकले, माळोदे यांनी पंच म्हणून काम पाहिले. वाडीवऱ्हेचे ग्रामपंचायत सदस्य गोविंद डगळे तसेच मेट भुजबळ नॉलेज सिटीचे रवींद्र माणके, अनिल भामरे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वितेसाठी योगीराज गायकवाड, प्राजक्ता मंडले, रवींद्र बिडवे, दिलीप आहेर, विशाल थोरात, किरण चव्हाण, महेश बोरसे, राजेंद्र महाले आदींनी प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.