Nashik News : शहरात अनधिकृत कॅफेची अचानक तपासणी मोहीम; या कॅफेंवर कारवाई

surprise inspection drive for unauthorized cafes in nashik news
surprise inspection drive for unauthorized cafes in nashik newsesakal
Updated on

Nashik News : एमडी ड्रग्ज रॅकेटचा नाशिकमध्ये पर्दाफाश झाल्यानंतर तरुणाई नशेच्या आहारी गेल्याचे प्रकार समोर येत असल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी आठ दिवसात नशेचा बाजार संपविण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्याअनुषंगाने पोलिसांसह महापालिकेच्या पथकाने शहरात अनधिकृतपणे चालणाऱ्या नऊ कॅफेची अचानक तपासणी केल्याने खळबळ उडाली.

शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांचे रॅकेट कार्यरत असल्याच्या तक्रारी होत्या. (surprise inspection drive for unauthorized cafes in nashik news)

दोन आठवड्यापूर्वी शिंदेगावात एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकल्याने नाशिक राज्यभर चर्चेत आले. एमडी ड्रग्जची राजधानी असल्याची चर्चा सुरू झाली. यावरून राजकारणदेखील सुरू झाले. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या.

त्याअनुषंगाने शहरात कॅफे तपासण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. कॅफेमधून अमलीपदार्थांची विक्री होत असल्याचे चर्चा होती. कॅफेमधून सिगारेट तसेच अनधिकृतपणे हुक्का पार्लरदेखील चालवले जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्याअनुषंगाने बुधवारी (ता. १८) सायंकाळी नाशिक महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांनी शहरातील कॉलेज रोड व गंगापूर रोड भागात कॅफेची तपासणी केली.

कॅफेची तपासणी करताना महापालिकेच्या नगररचना विभागाचे पथकदेखील सहभागी झाले होते. शहरातील कॅफेमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यात इमारतींच्या मूळ संरचनेत बदल केल्याचे तक्रारी होत्या.

surprise inspection drive for unauthorized cafes in nashik news
Nashik Crime: सिन्नर शहरातील 4 कॉफी शॉप पोलिसांकडून उध्वस्त; विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायचे प्रायव्हसी अन...

अनेक ठिकाणी पार्टिशन टाकून कॅफे चालले जात आहे. मात्र पार्टिशन टाकताना महापालिकेकडे नोंद नसल्याची तसेच घरपट्टीच्या रेकॉर्डवरदेखील व्यावसायिक वापराची नोंद आहे की नाही हे तपासण्यासाठी महापालिकेच्या पथकाची मदत घेण्यात आली. अनधिकृतपणे फेरबदल करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

"गंगापूर रोड व कॉलेज रोड भागात नऊ कॅफेंची तपासणी केली जात आहे. मूळ बांधकाम परवानगी व वापरात झालेले अनधिकृत बदल, व्यावासयिक घरपट्टीची नोंद या बाबींची पडताळणी करून कारवाई केली जाणार आहे." - संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता, नगर रचना विभाग, महापालिका.

कारवाई झालेल्या ८ आस्थापना

सिझर कॅफे, यारी कट्टा, कॅफे क्लासिक डे लाइट, हॅरीज किचन कॅफे, पॉकेट कॅफे, वालाज कॅफे टेरिया, मुरली कॅफे, मॅजिक वर्ल्ड या कॅफेवर कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मीकांत निंबाळकर, दिलीप ठाकूर, महापालिका उपायुक्त श्रीकांत पवार, अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल, नगर रचना उपसंचालक हर्षल बाविस्कर, हरीश चंद्रे, राजाराम जाधव आदींनी धडक मोहीम राबविली.

surprise inspection drive for unauthorized cafes in nashik news
Nashik Crime : इंदिरानगर पोलिसांकडून कॉफी शॉपवर कारवाई; अश्लील चाळे करण्यासाठी केबिन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.