नाशिक : मध्य रेल्वेच्या अनेक मार्गावर नवीन रेल्वेमार्ग प्रस्तावित असून त्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील विविध सर्व्हेक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरदूत करण्यात आली आहे. यात नाशिक रोड सिन्नरमार्गे शिर्डी रेल्वेमार्गाचा विचार सुरु आहे.
नाशिक रोड शिर्डी मार्गाशिवाय कसारा इगतपुरी हा नवीन रेल्वेमार्ग प्रस्तावित असून या दोन्ही मार्गामुळे नाशिक जिल्ह्यातील रेल्वे सुविधांचे जाळे भक्कम होण्यास मदत होईल. भुसावळ विभागातील विविध कामांसाठी अर्थसंकल्पात १४७०.९४ कोटीची तरदूत आहे. (Survey of Shirdi Railway via Sinnar Nashik News)
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
त्यात इगतपुरी-भुसावळ नवीन तिसऱ्या ३०८ किमी मार्गासाठी ७२ लाखांसह नाशिकरोड सिन्नरमार्गे शिर्डी या ७२ किमी रेल्वेमार्गाचा विचार सुरु आहे. मागील २०२१-२२ आर्थिक वर्षात १७.८० लाखांची तरदूत होती.
मनमाड- जळगाव नवीन चौथा रेल्वेमार्ग प्रस्तावित असून त्यासाठीच्या अंतिम सर्व्हेक्षणासाठी १ कोटी प्रस्तावित आहे. दरम्यान रेल्वेच्या तिकीट वितरणाची क्षमता वाढविण्याचे नियोजन आहे.
सध्या एका मिनिटाला साधारण २५ प्रवाशी ऑनलाइन तिकीट घेउ शकतात. यंदाच्या वर्षी सप्टेंबर २०२३ पासून देशात एका मिनिटाला साधारण २.२५ लाख प्रवाशी ऑनलाइन तिकीट घेऊ शकणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.