तिकीट निरीक्षकाला मारहाण करून फरारी संशयिताला अटक

Crime
Crimeesakal
Updated on

नाशिक रोड : चार वर्षांपूर्वी रेल्वेत तिकीट निरीक्षकाला मारहाण करून फरारी संशयिताला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. २०१८ ला ही घटना दादर अमृतसर एक्स्प्रेसमध्ये घडली होती. या गाडीत तिकीट तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यास नाशिक येथील रहिवासी प्रदीप गोफणे (२५) याने मारहाण करून फरार झाला होता. (suspect arrested due to beating TC 4 years ago, in judicial custody for 15 days in nashik)

Crime
मुख्याध्यापकाचं धक्कादायक कृत्य, महिला शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोरच केली चपलेने मारहाण

टीसीच्या फिर्यादीवरून नाशिक रोड लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल होता. लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी जुन्या गुन्ह्याचा तपास करण्याबाबत आदेश दिले होते. यानंतर मंगळवारी लोहमार्ग गुन्हे शोध पथकाचे हवालदार संतोष उफाडे- पाटील, विलास इंगळे, चंद्रभान उबाळे हे रेल्वे स्थानकावर गस्त करीत असताना फलाट एकवरील गुन्ह्यातील प्रमुख संशयित प्रदीप गोफणे हा मिळून आला.

त्याला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपास लोहमार्ग प्रभारी पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप भालेराव करीत आहे. गोफणे यास मनमाड न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

Crime
आयशरमध्ये आढळले 3 टन मांस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.