Nashik Fraud Crime : वृक्षतोड ठेक्याचे आमिष साडेचार लाखांची फसवणूक

महापालिका वृक्षतोडीचा ठेका घेण्याचे आमिष दाखवून संशयिताने एकाची साडेचार लाखांची फसवणूक केली.
crime
crimeesakal
Updated on

Nashik Fraud Crime : महापालिका वृक्षतोडीचा ठेका घेण्याचे आमिष दाखवून संशयिताने एकाची साडेचार लाखांची फसवणूक केली. भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सुभाष नारायण आहेर असे संशयिताचे नाव आहे. (suspect cheated of four lakhs by pretending to take municipal tree felling contractors nashik news)

तक्रारदार किशोर घोडके यांना त्यांच्या ओळखीतील व्यक्ती संशयित सुभाष आहेर याने दोघे मिळून महापालिका वृक्षतोडीचा ठेका घेण्याचे आमिष दाखवले. अनामत रकमेपोटी ५ लाखांची मागणी केली. तक्रारदार यांनी त्यास प्रत्यक्ष ३ लाखांची रोख रक्कम दिली.

त्यानंतर २१ मार्च २०२३ पुन्हा फोन पे द्वारे ऑनलाइन १ लाख ५० हजाराची रक्कम संशयिताच्या खात्यावर वर्ग केली. अनामत रकमेपोटी साडेचार लाख रुपये संशयितास दिले.

crime
Nashik Fraud Crime : बिनव्याजी कर्जप्रकरणी दीडशेवर तक्रारी; गुन्हे शाखेकडून चौकशी

त्यानंतर तक्रारदार यांनी महापालिकेत जाऊन संबंधित ठेक्याबाबत माहिती घेतली असता असा कुठलाही ठेका काढला नसल्याची माहिती महापालिकेतून प्राप्त झाली.

यामुळे संशयिताची भेट घेतली असता त्याने खोटे बोलल्याची कबुली देत डिसेंबर २०२३ मध्ये रक्कम परत करणार असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात अद्याप रक्कम दिली नाही. त्याच्याशी संपर्क केला असता उडवाउडवीचे उत्तर दिले. यामुळे फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आल्याने गुन्हा दाखल केला आहे.

crime
Nashik Fraud Crime : भिकाऱ्याला दाखविले चक्क जमिनीचा मालक; 5 संशयितांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.