Nashik Crime News : पीडित युवतीच्या मृत्यूनंतर संशयिताचीही आत्महत्या; दिंडोरी तालुक्यातील घटना

Nashik Crime News : पीडित युवतीच्या मृत्यूनंतर संशयिताचीही आत्महत्या; दिंडोरी तालुक्यातील घटना
Updated on

Nashik Crime News : पिंपळनारे (ता. दिंडोरी) येथील बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी पोलिस कोठडीत तपास चालू असताना पोलिसांच्या हातातून निसटून फरारी झाला होता. फरारी संशयिताचा मृतदेह विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षकांनी यातील तपासी अधिकारी व पोलिसास निलंबितही केले.

पिंपळनारे येथील ग्रामपंचायत सदस्य उमेश बंडू खांदवे (वय ३५) या विवाहित युवकावर गावातीलच वीसवर्षीय युवतीने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची फिर्याद नोंदविली होती. संशयित उमेश खांदवे याला दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. (Suspect committed suicide after victim death nashik crime news)

न्यायालयाने आरोपीस ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस तपासात दिंडोरी पोलिसांनी संशयिताला स्थळ पंचनाम्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे घेऊन गेले होते. तेथून परतताना संशयिताने लघुशंकेचा बहाणा करून पोलिसांच्या हाताला झटका देत फरारी झाला होता. दरम्यान, २८ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास पोलिसांच्या तावडीतून फरारी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शेतातील विहिरीच्या कडेला कपडे व चपला आढळून आल्या होत्या.

त्यासोबत एका चिठ्ठीमध्ये गावातील काही व्यक्तींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे नमूद करून चिठ्ठी लिहून ठेवली होती. तेव्हा विहिरीत अपात्ती व्यवस्थापनाच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु विहिरीमध्ये पाणी जास्त असल्याने यश आले नाही. मंगळवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास उमेशचा भाऊ विहिरीजवळ जाऊन बॅटरीच्या सहाय्याने विहिरीमध्ये बघितले असता, त्यात उमेशचा मृतदेह आढळून आला.

त्या वेळी त्यांनी तत्काळ दिंडोरी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच दिंडोरीचे पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे व पोलिस तेथे दाखल झाले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाच्या पायाला मोठा दगड बांधल्याचे आढळून आले.

Nashik Crime News : पीडित युवतीच्या मृत्यूनंतर संशयिताचीही आत्महत्या; दिंडोरी तालुक्यातील घटना
Nashik Crime: खळबळजनक! हात बांधून पाण्यात टाकलेला मृतदेह आढळला; नांदूरशिंगोटे बायपासवर आढळली बेवारस दुचाकी

दिंडोरी येथील न्यायाधीश यांच्यासमोर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह विच्छेदनासाठी धुळे येथील फॉरेन्सिक विभागामध्ये पाठविण्यात आला. दिंडोरी पोलिसांनी आस्कामिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी एस. आर. बांबळे तपास करीत आहेत.

तपासी अधिकारी निलंबित

या गुन्ह्यात संशयिताला पोलिस कोठडी मिळाल्यानंतर पोलिस तपास करताना संशयित पोलिसांच्या तावडीतून फरारी झाला. त्यानंतर पीडित युवतीने आत्महत्या केली. त्याचबरोबर फरार संशयिताचा मृतदेह विहिरीमध्ये आढळला. यात हलगर्जीपणाचा ठपका ठेवून पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी या तपासातील अधिकारी उपनिरीक्षक पांडुरंग कावळे व पोलिस नाईक सुदाम धुमाळ या दोघांना निलंबित केले आहे.

"बलात्कार प्रकरणातील संशयित उमेश खांदवे याने मृत्यूपूर्वी आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या काही व्यक्तींची नावे लिहून ठेवली आहे. याबाबत सखोल चौकशी करून सत्यता पडताळण्यात येईल. आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाहीसाठी गुन्हा नोंद करण्यात येईल." - एस. आर. बांबळे, पोलिस उपविभागीय अधिकारी, कळवण

Nashik Crime News : पीडित युवतीच्या मृत्यूनंतर संशयिताचीही आत्महत्या; दिंडोरी तालुक्यातील घटना
Nashik Crime: नाशिकच्या व्यापाऱ्याची तांदूळ खरेदीपोटी फसवणूक; प. बंगालच्या व्यापाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.