Nashik Crime: दिंडोरी रोडवरील तलाठी परीक्षा केंद्राबाहेर एक संशयित ताब्यात; साहित्य हस्तगत

वॉकी टॉकी, हेडफोन, टॅब,दोन मोबाईल हस्तगत
walkie talkie, headphones, tab, two mobile phones seized
walkie talkie, headphones, tab, two mobile phones seizedesakal
Updated on

Nashik Crime : राज्यभरात तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरतीसाठी परिक्षेला सुरुवात झाली आहे.

या परीक्षे दरम्यान गुरुवार (ता.१७) रोजी म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील दिंडोरी रोडवरील एका परीक्षा केंद्रा बाहेरून एका संशयितास वॉकी टॉकी, हेडफोन, टॅब, दोन मोबाईल सह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू असून अधिक तपास पोलिस करीत आहेत. (Suspect detained outside Talathi Exam Center on Dindori Road Nashik Crime)

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात सुरुवात झाली आहे.

गुरुवार (ता.१७)रोजी दिंडोरी रोडवरील रिलायंस पेट्रोलपंप जवळील मधुर स्वीट शेजारील वेबइझी इन्फोटेक या परिक्षा केंद्रात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती. 

यावेळी परीक्षा केंद्राच्या समोरील एका चायनीज हॉटेल मध्ये सकाळी १० वाजेच्या सुमारास एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती म्हसरूळ पोलीसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

walkie talkie, headphones, tab, two mobile phones seized
Nashik Crime: निवाणे ग्रामपंचायतीत 30 लाखाचा अपहार; पेसा निधी हडप केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

या ठिकाणाहून सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून दोन मोबाईल, हेडफोन, श्रवणयंत्र आणि एक टॅब, असे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांकडून पोलीस ताब्यात घेतलेल्या मोबाईल आणि टॅबमध्ये सुरु असलेल्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेतील प्रश्नांची फोटो मिळून आला आहे.

हा संशयित 'त्या' परीक्षा केंद्रात कोणास मदत करत होता, यात आणि कुणाचं सहभाग आहे का?याचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर आणि कर्मचाऱ्याकडून कारवाई करण्यात येत आहे.रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

"राज्यभरात ठिक - ठिकाणी तलाठी पद भरतीसाठी परिक्षा सुरू आहेत .मधुर स्वीट जवळील वेबइझी इन्फोटेक बाहेरील परिसरात एक संशयित रित्या फिरत होता, म्हसरूळ पोलिसानी त्यास ताब्यात घेतले असता वॉकी टॉकी, हेडफोन, टॅब, दोन मोबाईल मिळून आला.सदर संशयित हा परिक्षा केंद्रात कुणास माहिती पुरवत होता, यात आणखी कुणाचा सहभाग आहेत का? हे तपासा दरम्यान उघड होईल." - किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक, नाशिक शहर.

walkie talkie, headphones, tab, two mobile phones seized
Baramati Crime : एकाच रात्रीत 16 सदनिका फोडल्याने बारामतीकर चिंताग्रस्त...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.