सिडको (नाशिक) : पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांची बदनामी करून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी (nashik police) अवघ्या चार तासांत ताब्यात घेत अटक केली. अंबड पोलिस ठाणेहद्दीत १८ ऑगस्टला महेंद्र पाटील याने पालकमंत्री भुजबळ यांच्या बंगल्यावर कामाला नसताना तसे भासवत व त्यांचे नाव सांगत कासुर्डे यांना फोनवर संपर्क साधून त्यांच्या पत्नीविरोधात निफाड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्याचे आश्वासित केले. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
'‘पालकमंत्री भुजबळ साहेबांच्या बंगल्यावरून बोलतोय, तुमचा जो काय विषय झाला आहे, याबाबत साहेबांचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. तुम्ही मला समक्ष येऊन भेटा, यावर आपण तोडगा काढू’', असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांची बदनामी व फसवणूक करण्याचा प्रकार घडला होता. पोलिस उपाआयुक्त संजय बारकुंड व विजय खरात यांनी गुन्हे शोध पथकाला मार्गदर्शन करीत तपासाच्या सूचना दिल्या. संशयित महेंद्र पाटील याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्हे शाखेकडील, तसेच अंबड पोलिस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांनी कसून शोध घेत ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करता कासुर्डे यांना दूरध्वनी करीत वरीलप्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली.
'हॅलोsss भुजबळ साहेबांच्या बंगल्यावरून बोलतोय'!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (ता.१८) रात्री नऊच्या सुमारास संशयित महेंद्र पाटील (४६, रा. गंगापूर रोड, नाशिक) याने उगाव (ता. निफाड) येथील रहिवासी कासुर्डे यांना फोन करून मी भुजबळ साहेबांच्या बंगल्यावरून बोलत आहे. तुमच्या केसमध्ये मी तुम्हाला मदत करू शकतो, माझे भुजबळ साहेबांशी बोलणे झाले आहे. माझे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्याशीही बोलणे झाले आहे. परंतु तुम्ही समक्ष या, नाही तर तुमचा माणूस मला भेटायला पाठवा. खाली हात पाठवू नका. काय असेल ते करून घेऊ’ असे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने कासुर्डे यांना फोनवर संभाषण करणाऱ्या संशयित महेंद्र पाटील यास अंबड पोलिसांनी अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.