Nashik Crime : भरदिवसा चार संशयितांनी पूर्ववैमनस्य तसेच आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून महालक्ष्मीनगर भागात मयूर केशव दातीर या युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला होता.
पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत बारा तासातच खुनातील संशयित करण अण्णा कडुसकर (२१), मुकेश अनिल मगर (२५), रवींद्र शांताराम आहेर (२८), तसेच या तिघांनाही साथ देणारा राकेश कैलास शेलार यालाही मोखाडा (जि. पालघर) येथून ताब्यात घेतले. (Suspects arrested in Mayur Dater murder case in 12 hours Nashik Crime)
गुरुवारी (ता. १७) दुपारी मयूर दातीर या युवकाचा तिघांनी धारदार शस्त्राने पोटावर, तसेच छातीत सपासप वार करून खून केला होता. पोलिसांनी घटनेची तीव्रता लक्षात घेत सहा पथके संशयितांच्या शोध घेण्यासाठी रवाना केली होती.
गुरुवारी रात्री उशिरा एकच्या सुमारास संशयितांना जव्हार मोखाडा येथून ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी चारही संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता, २५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
खून प्रकरणाच्या तपासाकरिता इगतपुरी, त्र्यंबक, मोखाडा, नगर तसेच मुंबईच्या दिशेने एकूण सहा पथके रवाना केली होती. रात्री उशिरा संशयित मोखाडा येथील एका पाड्यावर असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस चौकीचे उपनिरीक्षक संदीप पवार यांना मिळाली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यानुसार संशयित याच भागात असल्याची खात्री झाल्याने अंबड गुन्हे शोध पथक, तसेच क्राईम ब्रँच युनिट एकचे पथक मोखाडा परिसरात दाखल झाले. यानुसार चारही संशयितांना शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले.
सदर कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त आनंदा वाघ, शेखर देशमुख, विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार, नाईद शेख, तोडकर, जनार्दन ढाकणे, कुणाल राठोड, समाधान चव्हाण, पवन परदेशी, सचिन करंजे, राकेश राऊत, प्रवीण वाघमारे, रवी बागूल आदींनी केली. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर केवळ बारा तासांच्या आतच संशयितांना पोलिसांनी अटक केल्याने ग्रामस्थांसह सिडकोवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.