Nashik NMC News : मनपाच्या शौचालयांमधून वीजचोरी होत असल्याचा संशय

Electricity Power theft case
Electricity Power theft case esakal
Updated on

नाशिक : शहरात महापालिकेकडून उभारलेल्या शौचालयांची बिले अधिक येत असल्याने येथून वीजचोरी होत असल्याचा संशय व्यक्त होत असून, शौचालयांमधील विद्युत व्यवस्थेचा आढावा घेण्याबरोबरच शौचालयांची पाहणी करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. (Suspicion of theft of electricity from NMC toilets Nashik News)

शहरात महापालिकेच्या जवळपास साडेतीनशेहून अधिक शौचालय तसेच प्रसाधनगृहे आहे. शौचालय व प्रसाधनगृहांना महापालिकेकडून पाणीपुरवठा व वीज पुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याचा स्वखर्च आहे, मात्र वीज पुरवठ्याचा खर्च मासिक बिलाच्या माध्यमातून अदा केला जातो. साधारण एका शौचालयाचे किंवा प्रसाधनगृहाचे बिल दोनशे रुपयांच्या आत येणे अपेक्षित आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक बिल येतात.

जवळपास दुप्पट, तिप्पट पट दिले प्राप्त होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने येथून वीजचोरी होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात शौचालयांची समक्ष पाहणी करण्याबरोबरच विद्युत व्यवस्थेचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या शौचालयांमध्ये विद्युत व्यवस्था नाही, तेथे सौर पॅनलच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

Electricity Power theft case
Nashik News : त्र्यंबकेश्वरचे 97 किलोमीटर क्षेत्र संरक्षित; भूमाफियांना आळा बसणार!

त्याचबरोबर शौचालयांच्या भोवती व्हर्टिकल गार्डन तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आल्या. मोडकळीस, जीर्णावस्थेत तसेच तक्रार प्राप्त शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे.

तृतीयपंथीयांना शौचालय नाही

शासनाच्या नियमाप्रमाणे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय उभारण्याच्या सूचना आहेत. परंतु नाशिक शहरांमध्ये एकही शौचालय नाही. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विकासाचे पालन करून प्रत्येक विभागात एक याप्रमाणे तृतीयपंथीयांसाठी शौचालय उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Electricity Power theft case
Winter Season Food : ऐन थंडीत सुकामेवा गरम; मेथीचे लाडू बनविण्यासाठी गृहिणींची लगबग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()