Swachh Bharat Abhiyan: स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा; दुभाजकांमध्ये अस्वच्छता, निधी खर्चास मिळेना मुहूर्त

Garbage, grass in the bifurcation of the road from Gajammal to Sarada Circle
Garbage, grass in the bifurcation of the road from Gajammal to Sarada Circleesakal
Updated on

Swachh Bharat Abhiyan : स्वच्छ भारत अभियानाचा बिगूल वाजल्यानंतर शहरात स्वच्छता होणे अपेक्षित असताना त्या उलट चित्र दिसून येत आहे. जवळपास ८० दुभाजकांमध्ये अस्वच्छता निर्माण झाली असून, महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.

द्वारका ते सारडा सर्कल व सारडा सर्कल ते गंजमाळ सिग्नल या प्रमुख मार्गावर दुभाजक कुंड्या झाल्या आहेत. (Swachh Bharat Abhiyan Uncleanness in dividers not getting funds for spending nashik news)

शहरात जवळपास ५१ दुभाजक असून त्याची लांबी ८० किलोमीटरच्या आसपास आहे. शहर सौंदर्यीकरणासाठी दुभाजक लावले जातात. परंतु नाशिक शहरातील दुभाजक स्वच्छतेपेक्षा अस्वच्छतेमुळेच अधिक चर्चेत आले आहे.

हवेतील नायट्रोजन, सल्फरडाय ऑक्साईड, असे सस्पेंडेड पार्टिकल मॅटर विषारी घटक शोषून घेणारी वनस्पती रस्ता दुभाजकांमध्ये लावण्याचे नियोजन क्लीन एअर प्रोग्रॅमअंतर्गत करण्यात आले होते. केंद्र सरकारकडून त्यासाठी निधीदेखील प्राप्त झाला, परंतु निधी खर्च करण्यास अद्यापही मुहूर्त लागला नाही.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Garbage, grass in the bifurcation of the road from Gajammal to Sarada Circle
NMC To PWD : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उड्डाणपुलासाठी टाळाटाळ; महापालिकेकडून सचिवांना स्मरणपत्र

शहर सौंदर्यीकरण अभियानात

- अस्वच्छ जागांची निश्‍चिती करून त्या जागांचे सौंदर्यीकरण करणे.
- भित्तिचित्रे, कारंजे, शिल्प उभारणे, जनजागृती चित्र रेखाटने.
- ट्रॅफिक आयर्लंड सुशोभीकरण करणे.
- दुभाजक स्वच्छ करणे, दुभाजकांवर शिल्प लावणे, फुलझाडांची लागवड करणे.
- प्रमुख इमारती, शैक्षणिक संस्थांच्या इमारती व हेरिटेज इमारतींवर समर्पक भित्तीचित्र रेखाटने.
- भुयारी मार्ग, पादचारी मार्ग, उन्नत मार्ग, उड्डाणपूल सुशोभित करणे.
- जलाशय स्वच्छ करणे.
- एलईडी प्रकाश योजना व विद्युत रोषणाई करणे.
- झोपडपट्टी व गावठाण स्वच्छता करणे.

असे आहेत शहरात विभागनिहाय फुटपाथ

विभाग रस्ता दुभाजक संख्या रस्ता दुभाजक लांबी फुटपाथ संख्या फुटपाथ लांबी (किलोमीटर)
पूर्व ०८ ११.७५ ०६ ०९
पश्चिम १० १४.०० ११ १२.८७
पंचवटी ०६ १६.९० ०५ १८.००
नाशिक रोड ०३ १०.८० ०५ १३.०
सिडको ११ १०.९५ ०५ ५.७०
सातपूर १३ १५.४४ ०७० ९.१५
--------------------------------------------------------------------------------------------------
एकूण ५१ ७९.८४ ४० ६७.७२

Garbage, grass in the bifurcation of the road from Gajammal to Sarada Circle
Mahavitaran News : अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल नियमानुसारच! महावितरणचे ग्राहकांसाठी स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.