Swachh Bharat Mission : शहरापाठोपाठ आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करून गावांचा कायापालट होणार आहे. जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ११८ गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन अतंर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे होणार आहेत. त्यासाठी ७४.११ कोटींच्या कामांचे विकास आराखडे तयार झाले आहे. या कामांची निविदा प्रक्रिया राबवून कामांना प्रारंभ होणार आहे.
केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत मिशन’चा टप्पा दोन सुरू केला आहे. या टप्प्यात सुरवातीला पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी दिला जात आहे.
यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषदेला निधी आला आहे. (Swachh Bharat Mission Transformation of 118 villages in district nashik news)
यानुसार जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ११८ गावांच्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या ७४ कोटींच्या कामांचा आराखडा तयार झाला आहे. पहिल्या टप्प्यात नदीकाठच्या गावांना प्राधान्य दिल्याचे सांगण्यात येते. या गावांमधील कामाचे प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहेत.
या उपक्रमांतर्गत पाच हजारांखालील लोकसंख्या असलेल्या गावांत घनकचऱ्यासाठी प्रतिव्यक्ती ६०, तर सांडपाण्यासाठी २८० रुपयाप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच, पाच हजारांवरील लोकसंख्येच्या गावांत घनकचऱ्यासाठी प्रतिव्यक्ती ४५ रुपये; तर सांडपाण्यासाठी ६६० रुपयांप्रमाणे निधी दिला जाईल. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने या कामांचे विकास आराखडे तयार करून त्यांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
गावांमध्ये होणार ही कामे
घनकचरा व्यवस्थापनात सार्वजनिक कंपोस्ट पिट निर्मिती, बॅटरीवरील व पायडेलची ट्रॉयसिकल वापरून कचरा गोळा करणे, प्लास्टिक कचरा साठवण्यासाठी शेड बांधणे, कुटुंबासाठी कचराकुंड्या देणे, सार्वजनिक कचराकुंड्या बसवणे, कुटुंब स्तरावर कंपोस्ट खतनिर्मिती करणे, गावस्तरीय बायोगॅस प्रकल्प उभारणे, कचरा वर्गीकरण, साठवण व कंपोस्ट प्रकल्प व्यवस्थापन करणे आदी कामे केली जाणार आहेत. तर सांडपाणी व्यवस्थापनात सार्वजनिक व कुटुंब स्तरावर शोषखड्डा निर्मिती, स्थिरीकरण तळे, नाले व बंदिस्त गटारी, टाकाऊ प्लास्टिकचा पुनर्वापर करणे आदी कामे असणार आहेत.
या गावांची झाली निवड
बागलाण- सौंदाणे, अंबासन, अंतापूर, ब्राह्मगाव, आरया, जिखेडा, लक्ष्मीपूर, मुगवाड, नामपूर, ताहराबाद, वीरगाव, केळझर, ठेंगोडा.
चांदवड- देवगाव, तळेगाव रोही, वडाळीभोई, वडनेरभैरव, देवळा- दहिवड, खर्डेा, लोहोणर, मेशी, उमराणे.
दिंडोरी- जानोरी, कसबे वणी, खेडगाव, कोचरगाव, लखमापूर, मातेरवाडी, मोहाडी, ननाशी, पालखेड, उमराळे, आशेवाडी.
इगतपुरी- घोटी, वाडीवऱ्हे.
कळवण- अभोणा, कनाशी, मानूर, निवाणे.
मालेगाव- आघार बुद्रुक, अजंग, चंदनपुरी, चिंचवड, दाभाडी, जळगाव, कळवाडी, कारंजगव्हाण, मुंगसे, नांदगाव, निमोण, पाटणे, रावळगाव, टाकळी, तळवाडे, तेहरे, वडेल, वडगाव, झोडगे.
नांदगाव- बोलठाण, जातेगाव, न्याडोंगरी, साकोरे.
नाशिक- गिरणारे, गोवर्धन, लहवित, पळसे, पिंप्रीसय्यद, सामनगाव, संसारी, शिंदे, विल्होळी.
नाशिक- खेंडलेझुंगे, चांदोरी, चाटोरी, चितेगाव, करंजगाव, कसबे सकेणे, खडकमाळेगाव, कोठुरे, लासलगाव, सुकेणे, नांदूरमध्यमेश्वर, नांदुर्डी, ओझर, पालखेड, पिंपळगाव बसवंत, पिंपळगाव नजीक, पिंपळस, सायखेडा, शिरवाडे वणी, टाकाळी विंचूर, उगाव, खेरवाडी, विंचूर.
सिन्नर- चास, दापूर, दोडी बुद्रुक, गुळवंच, माळेगाव, मुसळगाव, नायगाव, नांदूरशिंगोटे, पांढुर्ली, पांगरी बुद्रुक, शिवडे, सोनंबे, ठाणगाव.
त्र्यंबकेश्वर- अंजनेरी, हरसूल.
येवला- अंदरसूल, मुखेड, नगरसूल, पाटोदा, राजापूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.