Loksabha Election: नाशिक-धुळे लोकसभा मतदारसंघांत अदलाबदल; देवाणघेवाण सूत्राने एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता

Dada Bhuse, MP Hemant Godse, Ajay Boraste, MP Dr. Subhash Bhamre, harshawardhan dahite
Dada Bhuse, MP Hemant Godse, Ajay Boraste, MP Dr. Subhash Bhamre, harshawardhan dahiteesakal
Updated on

Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सूक्ष्म नियोजन करण्याची तयारी सुरू केली असून, त्या तयारीचाच एक भाग म्हणून नाशिक लोकसभेची जागा भाजपने व धुळे लोकसभेची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

नाशिक लोकसभेसाठी तयारी करणाऱ्या शिंदे गटाला धक्का मानला जात असला तरी धुळ्याची जागा मिळणार असल्याने शिंदे सेनेतील एक गट मात्र सुखावताना दिसत आहे. धुळेमधून शिंदे गटाचा उमेदवार कोण? या संदर्भातदेखील विचार सुरू आहे. (Swap in Nashik Dhule Lok Sabha constituencies election news)

पुढील वर्षाच्या एप्रिल-मेमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने सर्वाधिक जोरदार तयारी सुरू केली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड तसेच तेलंगण राज्याच्या निवडणुकांचा धक्कादायक निकाल लागल्यास जागावाटपाचे नवे नियोजन केले जाणार आहे. त्याअनुषंगाने यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणाचा आधार घेऊन मतदारसंघामध्ये अदलाबदल करण्याचा धाडसी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक जिल्ह्यात लोकसभेचे अडीच मतदारसंघ आहेत. नाशिक, दिंडोरी व धुळे. धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य व बाह्य या दोन्ही विधानसभेच्या मतदारसंघाचा समावेश होतो. धुळे मतदारसंघात भाजप, तर नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार आहेत. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात विद्यमान लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी दिसून येत आहे. शिंदे गटातही नवीन चेहऱ्याचा शोध सुरू असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभेत कुठल्याही परिस्थितीत २७२ चा आकडा गाठताना भाजपकडून कुठलीच कसर सोडली जाणार आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघावर शिंदे सेनेचा दावा असला तरी हातची जागा जाऊ नये, यासाठी भाजपकडून आग्रह धरला जात आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनही नाशिक लोकसभा मतदारसंघ यंदा भाजपलाच हवा, असा नारा देण्यात आला आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक मतदारसंघ भाजपने लढविल्यास शिंदे सेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला जागा सोडायची झाल्यास कुठला मतदारसंघ द्यायचा, यावर गांभीर्याने विचार सुरू आहे.

Dada Bhuse, MP Hemant Godse, Ajay Boraste, MP Dr. Subhash Bhamre, harshawardhan dahite
Nashik Drugs Case: साऊंड स्पिकरमधून MD ड्रग्जची नाशिकमध्ये तस्करी! सोलापूरातील एमडीचे दुसरे गोदाम उद्‌ध्वस्त

त्यात नाशिक व धुळे मतदारसंघात अदलाबदलीचा फॉर्म्युला जवळपास निश्‍चित होण्याच्या मार्गावर आहे.

लादलेला उमेदवार धुळेकर स्वीकारणार?

धुळे लोकसभा मतदारसंघात सद्यःस्थितीत डॉ. सुभाष भामरे सदस्य आहेत. त्याव्यतिरिक्त निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. प्रताप दिघावकर, गुजरात भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कन्या व धुळे जिल्हा परिषद सदस्या धरती देवरे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांनीदेखील उमेदवारी मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. अशा परिस्थितीत धुळे लोकसभा शिंदे सेनेकडे गेल्यास भाजपची टीम शिंदे सेनेकडून लादलेला उमेदवार मान्य करतील का, हाही एक प्रश्‍न आहे.

नाशिकमध्ये धक्कातंत्र

नाशिकमध्ये शिंदे सेनेचाच दावा असल्याचे बोलले जात असले तरी शिंदे सेनेला धुळे लोकसभेची जागा देण्याच्या चर्चेने स्थानिक नेत्यांमध्ये धस्स झाले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपने साथ न दिल्यास शिंदे सेनेला कसरत करावी लागेल. परंतु नाशिकमध्ये भाजपकडे स्वतःची भक्कम यंत्रणा आहे.

शिंदे सेनेने येथे मदत न केल्यास भाजपला फरक पडणार नाही. नाशिकमधून विद्यमान खासदारानंतर जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून बघितले जात आहे. अशा वातावरणात नाशिकच्या जागेत बदल झाल्यास त्यांच्यासाठीही ते धक्का असणार आहे.

Dada Bhuse, MP Hemant Godse, Ajay Boraste, MP Dr. Subhash Bhamre, harshawardhan dahite
Lalit Patil Drug Case: ललित पाटीलकडून 3 किलो साेने जप्त; पुणे पोलिसांकडून नाशिकमध्ये कसून चौकशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.