Nashik Accident News : समृद्धीवर स्विफ्ट कारचा अपघात; श्रीरामपूरच्या दोघांचा मृत्यू

Swift car accident on Samruddhi highway nashik accident news
Swift car accident on Samruddhi highway nashik accident newsesakal
Updated on

Nashik Accident News : समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते शिर्डी टप्प्यात सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास स्विफ्ट कारचा अपघात झाला.

या अपघातात कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाल्याने मृत्युमुखी पडले. हे दोघेजण अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. (Swift car accident on Samruddhi highway nashik accident news)

श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी श्रीकांत थोरात हे चालक हर्षल भोसले यांच्यासोबत स्विफ्ट डिझायर कार क्र.एम एच-१४ ई वाय- ७१९८ मधून इगतपुरी येथील भरवीर इंटरचेंज वरून समृद्धी महामार्गावर शिर्डीच्या दिशेने जात होते.

गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कार अपघातग्रस्त झाली. तीन ते चार पलट्या खात ही कार दुभाजकाच्या साईड बॅरिकेट्सला धडकून दोन्ही लेनच्या मधोमध जाऊन पडली.

किलोमीटर क्रमांक ५६० वर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाल्यावर गोंदे इंटरचेंज येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे मदत पथक तातडीने अपघात स्थळी रवाना झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Swift car accident on Samruddhi highway nashik accident news
Nashik Accident News: शिर्डी महामार्गावर 2 दुचाकींची धडक; 1 ठार; दोघे गंभीर जखमी

अपघाताची माहिती समजल्यावर वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी शैलेश शेलार, देविदास माळी हेदेखील अपघातस्थळी पोहोचले.

कारमधील दोघा जखमींना मोठ्या बाहेर काढत टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेतून सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथे पोहोचणे पूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान पोलिसांना अपघात ग्रस्त कारमध्ये एक लाख साठ हजार रुपये रोकड आढळून आली. ही रक्कम ताब्यात घेतल्याचे वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी शैलेश शेलार यांनी सांगितले. ही रक्कम थोरात की भोसले यांची होती याबाबत खातरजमा करून घेतल्यावर ती संबंधितांच्या नातेवाईकांकडे देण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

Swift car accident on Samruddhi highway nashik accident news
Gujarat Accident : अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या लोकांना भरधाव कारने चिरडलं; पोलीस कॉन्स्टेबलसह ९ जण जागीच ठार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.