सय्यद जरीफ चिस्ती हत्या प्रकरण : चिस्ती बाबाचे वावी कनेक्शन

Late Syed Zarif Chisti Baba & his residence
Late Syed Zarif Chisti Baba & his residenceesakal
Updated on

नाशिक : चिचोंडी औद्योगिक परिसरात मंगळवारी सायंकाळी अफगाण (Afghanistan) नागरिक असलेल्या तरुणाची गोळ्या (Murder) झाडून खून केल्याची घटना घडली. घटनेनंतर चौघे अनोळखी व्यक्ती चारचाकी गाडी घेऊन पोबारा झाले. रात्री उशिरा फॉरेन्सिक लॅबतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून, उपलब्ध माहितीनुसार शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. खून झालेल्या युवकाबरोबर असलेले त्याचे मित्र गफार व आणखी एक (नाव माहीत नाही) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. (Syed Zarif Chisti Baba lived in Wavi from year murder case nashik news)

चिस्ती बाबाचे वावी कनेक्शन

सय्यद जरीफ चिस्ती बाबा हा कथित धर्मगुरू सिन्नर तालुक्यातील वावी येथे वर्षभरापासून वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. वावी जवळच्या पिंपरवाडी शिवारात त्याने सिन्नर-शिर्डी महामार्गापासून एक किलोमीटर आत एक बंगला भाडोत्री घेतला होता. मुंबई येथे व्यवसाय करणाऱ्या एका वकिलाचा हा बंगला (Bunglow) होता. या बंगल्यात आपल्या दोन पुरुष सहकाऱ्यांसह तो राहायचा. त्यापैकी एक त्याचा चालक तर गफार दुसरा जवळचा सहकारी होता. या सहकाऱ्याच्या नावे त्याने परिसरात काही मालमत्ता खरेदी केल्या. तसेच आर्थिक व्यवहारही याच सहकाऱ्याच्या माध्यमातून करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यापासून त्याच्यासोबत दाऊदी तिरिना ही पस्तीस वर्षांची महिला राहत होती. ती त्याची तिसरी पत्नी असून आठ महिन्यांची गरोदर आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी वावी येथील चिस्ती राहत असलेल्या बंगल्याला भेट दिली. यावेळी पत्नी तीरीना हिची पोलिसांनी विचारपूस केली. मात्र, तिच्याशी बोलताना भाषेचा अडसर येत होता अफगाणिस्तानातील दरी नामक भाषेतून ती संभाषण करत असल्याचे पोलिसांना समजले. मात्र, ही भाषा तेथील स्थानिक भाषा असल्याने गुगल अथवा दुभाषेच्या मदतीने तिच्याशी संवाद साधने पोलिसांना शक्य झाले नाही.

Late Syed Zarif Chisti Baba & his residence
नाशिक : पावसामुळे तहानलेल्या गावांची संख्या निम्म्यावर

चिस्तीप्रमाणेच ती देखील भारतात रेफ्युजी म्हणून आश्रयास आली असून दोघांकडेही संयुक्त राष्ट्र संघाचे विशेष ओळखपत्र असल्याचे आढळून आले. अफगाणिस्तानातून पलायन केलेल्या चिस्ती च्या जीवाला धोका होता व म्हणूनच तो भारतात वास्तव्यास होता त्याच्याप्रमाणेच तीरीनाच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ नये यासाठी पोलिसांकडून तिला देखील संरक्षण पुरवण्यात आले आहे. वावी येथील बंगल्या भोवती सशस्त्र पोलिसांचा पहारा तैनात करण्यात आला आहे. तिरीना हिला जरीफ बाबाच्या मृत्यूबाबत मोबाईल फोन वरील फोटो दाखवून सांगितल्यावर तिने संताप व्यक्त केला तोडक्या मोडक्या पारशी शब्दांमध्ये तिने गफार बद्दल संशय व्यक्त केल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

Late Syed Zarif Chisti Baba & his residence
नाशिक : अज्ञात टोळक्याने केली युवकाची गळा चिरून हत्त्या

हल्लेखोर पळालेली महिंद्रा एक्सयुव्ही ही कार जरीफ बाबाची होती. सदर कार गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यातून हस्तगत केली आहे. गरीब हा अफगाणी नागरिक असल्याने त्याच्या अंत्यविधीबाबत अफगाणिस्तानच्या दूतावासाशी पोलिसांनी संपर्क साधला आहे. तिरीना हिच्या माध्यमातून देखील अफगाणिस्तानाशील नातेवाईकांची पोलिसांकडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षित ठेवण्यात येणार आहे.

वावी परिसरातील जमीन खरेदी विक्रीची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. तसेच चिस्ती बाबा याच्या बंगल्यात सापडलेल्या बँकेच्या कागदपत्रांवरून देखील आर्थिक व्यवहारांची माहिती पोलीस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.