Employees Transfer : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदली प्रक्रियेला अखेर मंगळवारी (ता.६) मुहूर्त मिळाला. मुख्यालयातील विविध विभागातील सुमारे ३९ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या समुपदेशाने करण्यात आल्या आहेत.
या बदली प्रक्रियेमुळे वर्षोनुवर्षे एकाच टेबलावर व विभागात ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांचे टेबल बदलून त्यांची उचलबांगडी प्रशासनाने केली आहे.
दुसरीकडे सर्वाधिक तक्रारी असलेल्या बांधकाम विभागातील अंतर्गत कर्मचाऱ्यांचे देखील टेबल बदलण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (table of employees will also change under ZP construction department 39 staff transfer at headquarters nashik news)
जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकाच टेबलावर जास्तीत जास्त तीन वर्षे व एका विभागात जास्तीत जास्त पाच वर्षे काम करता येईल असा शासन आदेश आहे.
त्यानुसार अंतर्गत बदल्या होणे आवश्यक असताना बदली प्रक्रीया झाली नव्हती. अनेक विभागातील वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन श्रीमती मित्तल यांनी अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या बदल्या टाळण्यासाठी प्रयत्न झाले.
परंतू श्रीमती मित्तल बदल्यांवर ठाम राहिल्या. मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांच्या उपस्थितीत समुपदेशनाद्वारे ही प्रक्रीया पार पडली. यात लेखा वगळता ३१ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या.
यासाठी एकूण ३६ कर्मचारी पात्र होते. यातील काही अधिकारी महिना दोन महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या बदल्या करण्यात आल्या नाहीत. याशिवाय मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात नऊ वर्षापासून काम करत असलेले गौतम अग्निहोत्री यांची बदली करण्यास प्रशासनाने नकार दिल्याने बदली झालेली नाही.
लेखा विभागातील २५ कर्मचारी बदलीस पात्र होते. परंतू यापैकी केवळ ८ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झालेल्या आहेत. जागा रिक्त नसल्याने बदल्या होऊ शकलेल्या नसल्याचे सांगण्यात आले आहे.
बांधकाम विभागातील अनेक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असल्याने त्या कर्मचाऱ्यांचे टेबल बदलण्याचे आदेश यावेळी मित्तल यांनी दिले. त्यामुळे विभागातील कर्मचाऱ्यांचे टेबल बदलण्यात येणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बांधकामाचा सावळा गोंधळ
दरम्यान, बांधकाम विभागातील ९ कनिष्ठ अभियंता यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली प्रक्रीया झाल्यानंतर विभागातील संबंधित कर्मचाऱ्याने लागलीच बदली झालेल्या अभियंत्यांना विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीचे आदेश न देता परस्पर आदेश दिले.
याची ओरड झाल्यानंतर, ते आदेश रद्द करत कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी पुन्हा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने नव्याने आदेश काढले. यात काही बदल झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती.
नाव (पदस्थापना)
रणजित पगारे (बांधकाम एक, ), अनिल गिते (लपा विभाग,), सोनाली भार्गवे (साप्रवि), सीताराम हगवणे (प्राथमिकशिक्षण ), उमेश चव्हाण (एकात्मिक बालविकास विभाग), वर्षा सांगळे (आरोग्य विभाग ), शोभा खैरनार (बांधकाम ३ ),
मनिषा जगताप (बांधकाम ३,), अनिता डावरे (नाशिक पंचायत समिती) , सलमाबानो शहा (प्राथमिक शिक्षण ), सुनीता फुलमाळी (प्राथमिक शिक्षण ), दत्तात्रय कोदे (एकात्मिक बालविकास विभाग),
देविदास चव्हाण (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) , सरोज बागूल (साप्रवि), अविनाश आहिरे (बांधकाम १,), चंद्रकला राऊत (बांधकाम २,), सोनाली साठे (बांधकाम 3) मिनाक्षी केदारे (आरोग्य विभाग), मिनाक्षी दांडगे (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग), नंदा परदेशी (बांधकाम २) , नम्रता तोटे (साप्रवि),
सुनील जाधव (आरोग्य विभाग), नीता शेवाळे (बांधकाम १) , घनश्याम पवार (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) ,रंजिता ठाकरे (नाशिक पंचायत समिती) , मनिषा काळे (बांधकाम ३) , ज्योती निकुंभ (नाशिक पंचायत समिती बांधकाम उपविभाग) , सुनीता जगताप (पं.सं. नाशिक), परिघा महाले (बांधकाम १,), अरुण भोये (शिक्षण विभाग,पं.स नाशिक), सरोजिनी चव्हाण
(माध्यमिक शिक्षण विभाग).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.