The bridegroom and his friends dance in Varati regardless of the summer
The bridegroom and his friends dance in Varati regardless of the summeresakal

Summer Wedding Season: दाट लग्नतिथी अन उन्हाचा कडाका सांभाळा! विविध व्यावसायिकांना आले सुगीचे दिवस

Published on

Summer Wedding Season : तालुक्यासह जिल्हाभरात सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून, त्यातच एकेका दिवशी अनेक लग्नतिथीमुळे वधू-वर पक्षाकडील लोकांसह व-हाडी मंडळींना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

यामुळे प्रत्येक गावात पाहुण्यांची गर्दी पहावयास मिळत आहे. दुसरीकडे उन्हाचा कडाका वाढल्याने सर्वानी दक्ष राहण्याची आणि काळजी घेण्याची गरज आहे.

एका तिथीला ६ ते ७ विवाहांना जाणे कुणालाही शक्य नसल्याने अनेकजण निमंत्रण मिळाले, पण खूप लग्न असल्याने येऊ शकलो नाही, क्षमा करावी असे सांगत आहेत. नाते संबंधातील लग्नाला जावेच लागत असल्याने मोठी दमछाक होत आहे. (Take care of summer wedding season nashik news)

एकत्र कुटुंबात पाच ते सात व्यक्ती असतील तर त्यांना वेगवेगळ्या विवाहांच्या ठिकाणी हजेरी लावणे शक्य होते; मात्र कुटुंब प्रमुखाला प्रत्येक ठिकाणी हजेरी लावणे शक्य होताना दिसत नाही. एक ते दीड महिन्यांपासून विवाहांचा धडाका सुरू झाला असून, एकाच दिवशी अनेक विवाह असल्याने वधू-वर पक्षाकडील मंडळींना त्रास सहन करावा लागत आहे.

विवाहासाठी येणारे पाहुणे फक्त हजेरी लावून भोजन न करताच निघून जातात. त्यामुळे अन्नाचेही नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाई असल्याने पाण्यासाठी मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

खर्चावर मर्यादा असणे गरजेचे

सध्या सर्वत्र महागाई व उसनवारीची परिस्थिती आहे. तरीही उसनवारी घेऊन का होईना मोठ्या धुमधडाक्यात लग्न उरकण्याचे प्रमाणही कमी झालेले नाही. गत तीन वर्षांपासून कोरोनामुळे व अस्मानी संकटामुळे शेतक-यांना नुकसानीचा सामना करावा लागला आहे.

त्यातच अवकाळी पाऊस, कधी अतिवृष्टी तर कधी खालावलेले बाजारभाव यामुळे शेतकरी पुरता अडचणीत आलेला आहे. असे असतानाही कर्ज काढून का होईना लग्ने धूमधडाक्यात केली जात आहे. याला आवर घालण्याची गरज असल्याचे मान्यवरांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The bridegroom and his friends dance in Varati regardless of the summer
Summer Fashion Tips: उन्हाळ्यात स्टायलिश दिसायचंय! मग रोजच्या रुटीनमध्ये करा हे 4 बदल

व्यावसायिकांना सुगीचे दिवस

विवाहासाठी मंगल कार्यालय, आचारी, वाजंत्री, डीजे, घोडा, विवाहाचे बॅनर, मंडपवाले, कापड दुकान, वऱ्हाडी मंडळीसाठी लागणारी वाहने यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. सकाळपासून उन्हाचा कडाका वाढत असला तरी भरदुपारी मात्र विवाह सोहळे उत्साहात पार पडत आहेत.

मे महिन्यातील उर्वरित तारखा

मे महिन्यात सुरवातीला १,२,३ ७ आणि ९ या तारखांना विवाहांची संख्या मोठी होती. एकेका दिवशी सात ते आठ लग्नाच्या पत्रिका एका व्यक्तीला होत्या. विशेष म्हणजे या तारखांचे बुकिंग हे आक्टोबर, नोव्हेंबरमध्येच झालेले होते. आता उर्वरित तारखा पुढीलप्रमाणे आहेत.: १०,११,१२,१५,१६,२१,२२,२९,व ३०

The bridegroom and his friends dance in Varati regardless of the summer
Summer Drink: साधं नारळपाणी पिऊन कंटाळलात मग हे स्पेशल हेल्दी ड्रिंक नक्की ट्राय करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()