Sakal Impact : अंबासन बसस्थानकावरुन बसेस लागल्या धावू; प्रवाशांनी मानले सकाळचे आभार

ST-Bus
ST-Busesakal
Updated on

अंबासन (जि. नाशिक) : येथील बसस्थानकात (Bus Stand) येऊन प्रवासी घेऊन जाण्याची तसदी देखील परिवहन मंडळाचे वाहक चालक घेत नसल्याने या बसस्थानकाचे त्यांना वावडेच झाले होते. (Taking notice of news senior officials instructed conductors drivers to go to bus stations sakal impact nashik news)

यामुळे वृध्द, दिव्यांग, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे अतोनात हाल होत होते. याबाबत 'सकाळ'ने 'अंबासन बसस्थानकाचे वाहक, चालकांना वावडे' या मथळ्याखाली बुधवारी (ता.१५) बातमी प्रसिद्ध केली होती.

या बातमीची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेत वाहक व चालकांना बसस्थानकांमध्ये जाण्याचे सूचना दिल्या. या सूचनेनुसार अंबासन बसस्थानकावर बसेस धावू लागल्याने ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

मालेगाव आघाराच्या बसेस अंबासन येथील बसस्थानकावर गेल्या अनेक महिन्यांपासून परिवहन मंडळाच्या वाहक व चालकांच्या मनमर्जी कारभारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

ST-Bus
Nashik News : मार्चपासून दळण ५ रूपये किलोने; निफाड तालुक्यातील पीठगिरणी चालकांचा निर्णय

दरम्यान वृद्ध, दिव्यांग, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशांना फाट्यावर पायपीट करीत ताटकळत बसावे लागत होते. वाहक व चालक उडवाउडवीची उत्तर देऊ वेगवेगळी कारणे प्रवाशांना देऊन दिशाभूल करीत होते.

बसस्थानकावरून बसेस सुरू करण्यासाठी ग्रामस्थांकडून परिवहन मंडळाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. बसस्थानकावर परिवहन मंडळाच्या बसेससाठी मोराणे, बिजोरसे, इजमाणे, चटाणेपाडा आदी परिसरातील प्रवासी परिवहन मंडळाच्या बसेस सोयीच्या असल्याने ताटकळत बसतात.

मात्र बसेस बसस्थानकावर फिरकत नसल्याने पायपीट करीत पुन्हा दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर औरंगाबाद राज्य महामार्गावरील अंबासन फाट्यावर जावे लागत होते.

ST-Bus
Nashik Crime News : ठाणगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा

याबाबत 'सकाळ'ने बातमी प्रसिद्ध करताच संबंधित विभाग खडबडून जागे होत अंबासन गावातून प्रवासी चढ-उतार करण्यासाठी कोणत्याही प्रकारे तक्रार उद्भवणार नाहीत यांची

खबरदारी घेण्यात यावी अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्यात येईल अशा मालेगाव आघार प्रमुखांनी वाहक व चालकांना लेखी सूचना दिल्या आहेत. बसस्थानकावर बसेस सुरू झाल्याने ग्रामस्थांनी 'सकाळ'चे आभार मानले.

"गावातील बसस्थानकावर परिवहन मंडळाची बस येत नसल्याने आम्ही मैत्रिणी महाविद्यालयात सायकलीवर जात होतो. यामुळे वेळ वाया जात होती. 'सकाळ'ने बातमी प्रसिद्ध करताच बसेस सुरू झाल्या." - स्वाती गोवेकर, विद्यार्थिनी अंबासन.

"महाविद्यालयात जाण्यासाठी बसेसचा पास काढूनही फाट्यावर पायपीट करून जावे लागत होते. बरेच वाहक व चालक फाट्यावरही बस थांब्यावर उभे करीत नसल्यामुळे अडचणींतून जावे लागत होते. गावातील बसस्थानकावर परिवहन मंडळाच्या बसेस येऊ लागल्यामुळे आनंद होत आहे." - वैष्णवी आहिरे, अंबासन

ST-Bus
Summer Onion Crop : उन्हाळी कांदा पिकात सोडल्या मेंढ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()