Talathi Exam : महिला परीक्षार्थींकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस; तलाठी परीक्षेदरम्यान सलग दुसऱ्या घटनेने खळबळ

Talathi Bharti
Talathi Bharti esakal
Updated on

Talathi Exam : गेल्या महिन्यातील तलाठी पेपर फुटी प्रकरण ताजे असतानाच आज म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील नामांकित शैक्षणिक संस्थेत परीक्षार्थी मुलीला इलेक्ट्रॉनिक डिवाइससह पकडण्याचा प्रकार परीक्षार्थी मुलाने उघडकीस आणला.

मात्र, पुढे काय झाले, ही बाब नेमकी गुलदस्त्यातच राहिली असून, मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित संस्थेतील अधिकाऱ्याकडून काही घडलं नसल्याचं सांगण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (talathi exam Electronic devices found from women student nashik news)

महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण चार हजार ३४४ पदांच्या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमिअभिलेख यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्याचे कामकाज सुरू आहे.

गेल्या महिन्यात दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळील मधुर स्वीटशेजारील परीक्षा केंद्रात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीच्या परीक्षा केंद्राबाहेरून एका संशयितास वॉकीटॉकी, हेडफोन, टॅब मोबाईलसह ताब्यात घेतले होते.

हे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी (ता. ५) दिंडोरी रोडवरील नामांकित शैक्षणिक संकुलात दुपारी तीन ते सायंकाळी पाचच्या दरम्यान तलाठी पेपर सुरू होता. या संकुलातील ब्लॉक क्रमांक १०१ मध्ये शेवटचा अर्धा तास बाकी असताना महिला सुपरवायझर यांना परीक्षार्थी मुलीकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सापडले.

या वेळी संबधित महिला सुपरवायझर यांनी इतर ब्लॉकमधील सहकारी सुपरवायझर यांना बोलावून घेत ते जप्त केले. त्यानंतर संबंधित परीक्षार्थी मुलीस बाहेर काढण्यात आले, अशी माहिती परीक्षार्थी मंगेश साळवे यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Talathi Bharti
Talathi Bharti Exam: तलाठी भरती परीक्षेचा पेपर फोडणारा आरोपीच झाला पास

तपासणी होते कुणाची?

परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पेपर देण्यासाठी जातो, त्या वेळी त्याची तपासणी केली जाते. हातातील धागे काढून घेतले जातात. तरीही अशा काही परीक्षार्थी मुली इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आत घेऊन जातात कशा, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. यात नेमकं दोषी कोण, परीक्षा केंद्र की परीक्षा केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, यात नेमकं सामील कोण हा प्रश्न परीक्षार्थींना पडला आहे.

"तलाठी पेपरची शेवटची वेळ असताना काही परीक्षार्थींनी, गैरप्रकार झाला असून सर्वांची तपासणी व्हावी, अशी मागणी केली. त्यानुसार सर्व परीक्षार्थीची तपासणी केली असता कुठलीही वस्तू सापडली नाही. ज्या मुलीवर संशय व्यक्त करण्यात आला होता, तिच्याकडेही काही सापडले नाही. गैरप्रकार झाल्याबाबत अफवा होती." - मनोज भालेराव

सीसीटीव्ही तपासा

परीक्षार्थी साळवे यांनी ब्लॉक क्रमांक १०१ चे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, त्यात सर्व प्रकार उघड होईल, असे आवाहन केले आहे. जेणेकरून कष्टकरी परीक्षार्थींना याचा न्याय मिळेल आणि कॉफीबहाद्दर या प्रक्रियेतून बाहेर पडतील, असेही ते म्हणाले.

"कॉपी प्रकरणाबद्दल कोणत्याही प्रकारची लेखी किंवा तोंडी तक्रार पोलिस ठाण्यात दाखल नाही. त्यामुळे असा काही कॉपीचा प्रकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे, याची माहिती नाही. याबाबत संबंधित संस्थेतीलच अधिकारी जबाब देतील." -राजू पाचोरकर व. पो. निरीक्षक, म्हसरूळ पोलिस ठाणे

Talathi Bharti
Talathi Exam : तलाठी परिक्षेला अवघ्या 60 सेकंदाच्या उशिरामुळे नाकारला प्रवेश! पुण्यातील प्रकार; विद्यार्थ्यांमध्ये संताप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.