Nashik Contract Employees: कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत साठी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांशी चर्चा

Devendra Fadnavis, Maharashtra State Electricity Workers Federation President Mohan Sharma, Joint Secretary P. V. Naidu etc
Devendra Fadnavis, Maharashtra State Electricity Workers Federation President Mohan Sharma, Joint Secretary P. V. Naidu etcesakal
Updated on

Nashik News : उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी नुकतीच भेट घेतली.

तिन्ही वीज कंपन्यांतील ४३ हजार कंत्राटी बाह्यस्रोत व सुरक्षारक्षकांना जे गेली १० ते १५ वर्षे सतत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत, त्यांना कायम नोकरीत कसे सामावून घेता येईल, अशा प्रस्तावाचे ५८ पानी पुस्तक श्री. शर्मा यांनी ऊर्जामंत्र्यांना सादर करून प्रस्तावावर चर्चा केली. (Talks with Deputy Chief Minister and Energy Minister for permanent service of contract employees Nashik News)

उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री फडणवीस यांनी ४ जानेवारी २०२३ ला मुंबईला ७२ तासांच्या संपावेळी झालेल्या चर्चेत वर्कर्स फेडरेशनला ४२ हजार कंत्राटी कामगारांना कशा पद्धतीने तिन्ही वीज कंपन्यांत कायम करता येईल, असा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.

त्या पार्श्वभूमीवर वर्कर्स फेडरेशनने २१ मार्चला तसा प्रस्ताव ऊर्जामंत्री, प्रधान सचिव (ऊर्जा), तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना सादर केला. त्या प्रस्तावावर नागपूरलाही चर्चा घडून आली.

४२ हजार कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत सामावून घेण्यास्तव वर्कर्स फेडरेशनने २३ जुलैच्या भेटीवेळी ऊर्जामंत्र्यांना देशातील वीज कंपन्यांनी तेलंगणा, हिमाचल प्रदेश, बिहार, तमिळनाडू, गोवा या राज्यांत कंत्राटी व बाह्यस्रोत कामगारांना कशा पद्धतीने कायम नोकरीत सामावून घेतले ते करार, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, संघटना व व्यवस्थापनाशी झालेले करार, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय, तेलंगणा वीज कंपन्यांत २४ हजार कंत्राटी कामगारांना २९ जुलै २०१७ च्या निर्णयान्वये कायम केल्याची मूळ प्रत असे ५८ पानांचे पुस्तक प्रस्तावाच्या अनुषंगाने २३ जुलैला ऊर्जामंत्री फडणवीस यांना चर्चेवेळी सादर केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Devendra Fadnavis, Maharashtra State Electricity Workers Federation President Mohan Sharma, Joint Secretary P. V. Naidu etc
B. Ed CET Exam: बीएड सीईटी परीक्षेसाठी उमेदवारांना अधिक वेळ

हे सर्व प्रकरण ऊर्जामंत्र्यांनी प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्याकडे पाठविले असून, ऊर्जामंत्र्यांच्या पातळीवर या विषयावर अंतिम निर्णयासाठी वाटाघाटी आयोजित करण्याची श्री. शर्मा यांनी ऊर्जामंत्र्यांना विनंती केली.

या वाटाघाटीत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे मोहन शर्मा व संयुक्त सचिव पी. व्ही. नायडू उपस्थित होते.

Devendra Fadnavis, Maharashtra State Electricity Workers Federation President Mohan Sharma, Joint Secretary P. V. Naidu etc
Nashik Crime: सेवन हॉर्स हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैधरीत्या हुक्का पार्लर प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.