पळसन : सुरगाणा तालुक्यातील अनेक समस्यांना कंटाळून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या पदाधिकाऱ्यांनीच आता उपोषणाचे हत्यार उचलले आहे. यामध्ये सुरगाणा नगरपंचायतचे भाजपचे नगरसेवक विजय कानडे, यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले असून त्या आंदोलनात जाहीर पाठिंबा म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र निकुळे सह पदाधिकारी उपोषणास बसले आहेत. (Taluka president along with BJP corporator on one day fast in Surgana Nashik)
तालुक्यातील विशेष करून आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज तसेच महसूल विभागातील समस्यांचा समावेश असून, अनेक वर्षापासून या समस्या अजून जैसे थे आहेत.
डॉ. भारती पवार यांना आरोग्य मंत्री पद मिळाल्यानंतर आदिवासी जनतेच्या आशा अपेक्षा उंचावल्या होत्या, आता आरोग्य शिक्षण सोयी सुविधा मिळतील, मात्र तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईन वर आहेत, काही ठिकाणी पुरेशे कर्मचारी वर्ग नाही.
भौतिक सोयसुविधा नाही, औषध तुटवडा, 108 रुग्णवाहिका, 102 रुग्णवाहिका, उपजिल्हा सुरगाणा, आदी सोयी सुविधा अद्यापही उपलब्ध नाहीत, या मागण्या निवेदनाद्वारे वेळोवेळी समस्या मांडल्या परंतु एकही समस्या अद्यापही सुटली नाही.
उपोषण करते नगरसेवक विजय कानडे यांनी विशेष करून आरोग्य विषयक समस्या निवेदनात मांडल्या आहेत. त्यामुळे नगरसेवक व तालुका अध्यक्ष राजेंद्र कुळे तसेच भाजपचे पदाधिकारी यांनी लाक्षणिय उपोषणाच्या माध्यमातून एक प्रकारे आरोग्यमंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
निवेदनात म्हटले की सुरगाणा शहरातील अंगणवाडी दुरुस्ती आणि रिक्त पदे भरणे, उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी भरती करणे, सिटीस्कॅन मशीन व सोनोग्राफी मशीन त्वरीत रुग्णालयात उपलब्ध करून सोयी सुविधा करून देणे,
सुरगाणा शहरातील बसस्टॉप सुशोभीकरण करण्यासाठी निधी आला तरी काम चालू न करणे, बस नादुरुस्त येतात तरी चालू स्थितीतल्या बस देण्यात याव्यात, तहसील कार्यालयात येणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था आणि पाणी व्यवस्था करणे, विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती देण्यात यावी,
शासकीय आश्रम शाळा अंगणवाडी माध्यमिक विद्यालय यांना पुरविण्यात येणाऱ्या आहाराची चौकशी व्हावी, कमी दाबाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा आणि शहरातील जुनी विद्युत लाईन बदलावी या मागण्या करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.