Nashik News : तालुकानिहाय 100 बड्या थकबाकीदारांची नावे जाहीर

District Bank
District Bankesakal
Updated on

नाशिक : वारंवार मागणी नोटिसा आणि तगादा लावूनही शेती कर्जाची थकबाकी न भरणाऱ्या जिल्हा बँकेच्या आजी -माजी संचालकांसह त्यांच्या नातेवाइकांभोवती बँक प्रशासनाने कारवाईचा फास आवळत, जिल्ह्यातील १०० बड्या थकबाकीदार शेतकऱ्यांची नावे जिल्हा बँकेने जाहीर केली होती.

या पाठोपाठ आता जिल्हा बॅंकेने तालुकानिहाय टॅाप १०० थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली आहे. बॅंकेच्या शाखा, ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सोसायटी आदी ठिकाणी ही यादी झळकविण्यात आली आहे. यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. (Taluka wise Names of 100 big arrears announced Nashik News)

District Bank
Nashik News : जिल्ह्यातील आंतरराज्य सीमांवर नाकाबंदी

नाशिक जिल्हा बँकेचा २०२२-२३ आर्थिक वर्षाचा कर्ज वसुली हंगाम सध्या सुरू आहे. जिल्हा बँकेची शेती कर्जाची एकूण १९१० कोटींची रक्कम वसुलीस पात्र आहे. त्यापैकी एक हजार ३७० कोटी रुपयांची जुनी थकबाकी आहे. जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले, तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणा-या थकबाकीदारांवर महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम १९६०च्या नियम १०१ नुसार कारवाईची मोहीम बँकेतर्फे हाती घेण्यात आली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून बँकेने अशा थकबाकीदार सभासदांच्या तालुकानिहाय याद्या तयार करून १०० थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात, विविध कार्यकारी संस्थेत आणि जिल्हा बँकेच्या शाखेत जाहीर करण्याची कार्यवाही केली होती.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

District Bank
Organ Donation : मरावे परी अवयव कीर्तिरूपी उरावे...! अवयवदानाची चळवळ होतेय वृद्धिंगत

या कार्यवाहीमुळे यातील अनेक बड्या थकबाकीदारांनी थकबाकी भरण्याची भूमिका घेत, थकबाकी भरली आहे. जिल्ह्यातील १०० थकबाकीदारांनंतर, आता जिल्हा बॅंकेने तालुकानिहाय थकबाकीदारांकडे मोर्चा वळविला आहे. त्यासाठी तालुकानिहाय बड्या १०० टॅाप थकबाकीदारांची यादी तयार केली आहे.

ही यादी जिल्हा बॅक शाखा, विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत कार्यालय तसेच गावात पोस्टर, बॅंनरद्वारे प्रसिद्ध केली आहे. यात अनेक राजकीय व्यक्ती, त्यासंबंधित नातेवाईक यांची नावे असल्याचे बोलले जात आहे. संबंधितांनी कर्जाची परतफेड न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा बॅंकेच्यावतीने देण्यात आला आहे.

District Bank
Nashik Crime News : मालेगावात तरुणाचा खून; संशयिताला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.