Nashik News: पन्नाशीतले प्रवासी अर्ध्या तिकिटात अन् साठीतल्यांचा फुकट प्रवास; सवलतीसाठी ‘आधार’ शी छेडछाड

Adhar Card Tempering
Adhar Card Temperingesakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकारने वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटी बसमधून संपूर्ण राज्यभर मोफत प्रवास करण्याची सवलत दिली आहे. याशिवाय पूर्वीपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाची पासष्टी ओलांडलेल्या सर्व नागरिकांना देखील ५० टक्के प्रवास भाडे सवलत देय आहे.

एसटीत बसल्यावर आधार कार्ड दाखवून ज्येष्ठ नागरिक प्रवास सवलतीचा लाभ घेतात. अर्थात सवलतीच्या प्रवास योजनेचा लाभ घेताना वय कमी बसत असल्याने अनेकांनी जुगाड करत थेट आधार कार्डवरील मजकुरातच छेडछाड केली आहे. (Tampering with Aadhaar for concession in bus fare Nashik Latest Marathi News)

स्मार्ट कार्ड म्हणजे एसटी महामंडळाने आधार संलग्न उपलब्ध करून दिलेले ओळखपत्र आहे. मात्र, बहुसंख्य लाभार्थींनी अद्याप स्मार्ट कार्डच काढले नसून आधार कार्ड दाखवून सवलतीच्या प्रवास योजनेचा लाभ घेतला जात आहे. हे करत असताना अनेक अपात्र प्रवासी आधार कार्ड वरील जन्म तारखेशी म्हणजेच वयाच्या तपशीलाशी छेडछाड करून प्रवास योजनेचा लाभ घेत आहेत. 'सकाळ' कडे दोन बनावट आधार कार्डचे फोटो नमुन्या दाखल प्राप्त झाले. त्यात एका महिला प्रवाशाच्या जन्मतारखेत बदल करताना चक्क २०४७ असे साल नोंदवण्यात आले आहे.

(वास्तविक तेथे १९४७ असा बदल संबंधिताला करायचा असावा.) तर दुसऱ्या कार्डमध्ये जन्माचे साल चक्क १४६ असे दाखवण्यात आले आहे. एका कार्डवर महिलेच्या ऐवजी पुरुषाचे नाव टाकण्यात आले आहे. अर्थात हा बदल आधार कार्डच्या मूळ डेटाशी छेडछाड न करता केवळ रंगीत प्रिंटवर करून दिला जातो. या चुका लक्षात न आल्याने तेच कार्ड एसटी प्रवासासाठी संबंधितांकडून वापरले जाते.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Adhar Card Tempering
Nashik News : जुने घर खरेदीनंतर वीजमीटर आपोआप नव्याच्या नावावर होणार; जाणुन घ्या

"बनावट आधार कार्ड दाखवून एसटीतून प्रवास करणारे बोगस प्रवासी आमच्या नजरेतून सुटत नाही. त्यामुळे प्रसंगी अनेकदा वादही करावा लागतो. मोबाईल फोन मधून आधार कार्डचा क्यू आर कोड स्कॅन करून पडताळणी केल्यावर ही बनवाबनवी लगेच लक्षात येते. अशावेळी प्रवाशाला त्याच्याकडून होणारी चूक सर्वांसमोर सांगितली जाते. ऐकले तर ठीक, नाहीच ऐकले तर बस पोलिस ठाण्यात नेण्याचे सांगितल्यानंतर बहुतांश प्रवासी घाबरून चूक मान्य करून नियमानुसार तिकिटाची मागणी करतात." - विलास विधाते, एसटी वाहक (नाशिक)

"पन्नाशीतला प्रवासी अर्ध्या तिकिटाची मागणी करतो. तर साठीतले आजोबा देखील ७५ च्या पुढील वयोगटातील आहोत म्हणून मोफत प्रवास सवलत योजनेचा लाभ मागतात. अशावेळी वाहकाकडून कायदेशीर कारवाईची धमकी देऊन संबंधित प्रवाशांना नियमानुसार तिकीट घेणे भाग पाडले जाते. अनेक स्मार्ट कार्ड धारकांनी तर आधारच्या मूळ डेटा मध्येच सोयीचा बदल करून वय वाढवून घेतले आहे. ही बाब प्रवासी समोर असल्याने लक्षातही येते. त्यांना देखील चूक समजावून सांगितली जाते. एसटीला तोट्यात आणणाऱ्यांचे बोगस आधारकार्ड जप्त करण्याचे अधिकार वाहकांना मिळाले पाहिजेत." -नागनाथ औताडे, वाहक (अक्कलकोट आगार)

Adhar Card Tempering
Success Story : इन्शीच्या गिरीशची आकाश भरारी!; आदिवासी कुटुंबातील युवक बनला पायलट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.