Jal Jeevan Mission : जलजीवन अभियानांतर्गत देशातील ग्रामीण भागातील नळजोडणी ३ कोटींवरून १३ कोटी घरापर्यंत पोचली.
ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू झालेल्या योजनेतून गोवा, तेलंगणा, हरियाना, गुजरात, पंजाब आणि हिमाचल प्रदेश अशा सहा राज्यात तसेच पाँडिचेरी, दीव-दवण, दादरा नगर हवेली आणि अंदमान निकोबार बेटे अशा तीन केंद्रशासित प्रदेशात योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी झाली आहे. (Tap connection in rural areas from 3 crore to 13 crore houses under Jal Jeevan Abhiyan Nashik news)
बिहारमध्ये ९६.३९, मिझोराममध्ये ९२.१४ टक्के घरांमध्ये नळजोडणी पोचली. ग्रामसभेच्या माध्यमातून संपूर्ण गावात सर्वांच्या घरी तसेच सार्वजनिक कार्यालये-स्थळे इथे नळ आणि नळातून पुरेसे, सुरक्षित आणि नियमित पाणी पोचत असल्याची पडताळणी केली.
त्यानुसार देशातील १४५ जिल्ह्यातल्या १ लाख ८६ हजार ८१८ गावांमध्ये नळाने पाणी पोचवण्याचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रातील नळजोडणीचे काम ७६ टक्क्यांच्यापुढे पोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ मध्ये योजनेची घोषणा केली होती.
योजनेची अंमलबजावणी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या भागीदारीतून केली जाते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नळजोडण्यांमुळे महिला आणि तरुणांच्या डोईवरील हंडे उतरण्यास मदत झाली असताना मुलांच्या शिक्षणाला हातभार लागल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. योजनांची दीर्घकालीन शाश्वतता साध्य करण्यासाठी, ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनांच्या नियोजन, अंमलबजावणी, संचालन आणि देखभालमध्ये सुरवातीपासून सामुदायिक सहभाग महत्त्वाचा असे म्हटले आहे. स्रोत आणि वितरणातील पाण्याचे नमुने नियमित तपासले जातात.
ठळक नोंदी
- १ जानेवारी २०२३ पासून दररोज ८७ हजार ५०० नळजोडणी
- उत्तरप्रदेशात जानेवारीपासून ६१ लाख ५ हजार घरांमध्ये नळजोडणी
- देशात शाळांमध्ये ९ लाख १५ हजार (८८.७३ टक्के) आणि अंगणवाड्यांमध्ये ९ लाख ५२ हजार (८४.६९ टक्के) नळजोडण्या पूर्ण
- देशातील ११२ जिल्ह्यात अभियान सुरु झाले असताना २१ लाख ४१ हजार (७.८६) टक्के असलेल्या नळजोडणी १ कोटी ८१ लाख (६६.४८) घरात पूर्ण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.