वाडीवऱ्हे (जि. नाशिक) : चिंचलेखैरे (ता. इगतपूरी) ग्राम पंचायत अंतर्गत खैरेवाडी येथील पाणी पुरवठा योजना पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने बंद केल्याने स्थानिक नागरिक व महिलांनी आंदोलनाचा ईशारा दिला होता.
याबाबत ‘सकाळ’मध्ये मंगळवारी (ता. ४) वृत्त प्रसिद्ध होताच इगतपुरी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने त्याची तातडीने दखल घेत संबंधीत विहीरीवरील नळ पाणी पुरवठा योजना सुरू केली आहे. (Tap water supply scheme started as soon as protest given SAKAL Impact nashik news)
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
खैरेवाडी येथील महिलांचे पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेले हाल बघुन एका सामाजिक संस्थेने सार्वजनिक विहिरीवर सौर ऊर्जेवर चालणारा वीज पंप बसवून नळपाणी पुरवठा योजना सुरु केली होती.
परंतु, भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईचे कारण दाखवून पंचायत समितीने सौर ऊर्जेचा वीज पुरवठा बंद करुन नळपाणी पुरवठा योजना बंद केली होती. त्याचवेळी खैरेवाडी येथील महिलांना डोक्यावर पाणी आणण्याचा अजब सल्ला देण्यात आला होता.
त्यामुळे संतप्त महिलांनी व ग्रामस्थांनी पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांच्या नेतृत्त्वाखाली संतप्त महिलांनी हा ईशारा दिला होता. त्याची तातडीने दखल घेत पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने संबंधीत विहिरीवरील वीज पुरवठा त्वरित सुरू केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.