PM Modi In Nashik : पंचवटी, तपोवनाला पोलिस छावणीचे स्वरूप; चोख सज्जता

पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन आणि पंचवटीतील रामतीर्थ परिसर व काळाराम मंदिर परिसराला पोलिसांच्या कडेकोट पोलिस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
A color rehearsal going on in the background of the road show on Aurangabad Road.
A color rehearsal going on in the background of the road show on Aurangabad Road. esakal
Updated on

PM Modi In Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन आणि पंचवटीतील रामतीर्थ परिसर व काळाराम मंदिर परिसराला पोलिसांच्या कडेकोट पोलिस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

तर, निलगिरी बाग मैदान ते जनार्दन स्वामी मठापर्यंत पंतप्रधान मोदी यांचा रोड शो होणार असल्याने या रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहे. (Tapovan and Panchavati have become like camp due to heavy police presence pm modi in nashik news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी (ता. १२) राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येत आहे. दौऱ्यात ते गोदाघाटावर जाऊन रामतीर्थ येथे गोदावरी नदीची महाआरती करणार आहेत. त्यानंतर ते श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन व आरती करणार आहेत. त्यानंतर महोत्सवाचे उद्‌घाटन होईल. तपोवनात जाहीर सभाही होणार आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यभरातून कडेकोट बंदोबस्तासाठी पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाचारण केले आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी, तर केंद्रीय स्तरावरील विशेष सुरक्षा पथकाचे (एसपीजी) अधिकाऱ्यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. या वेळी मैदानाची विशेष श्वान पथकामार्फतही तपासणी करण्यात आली.

निलगिरी बाग येथील हेलिपॅडवर उतरल्यानंतर पंतप्रधान मोदी हे विशेष बनविलेल्या खुल्या मोटारीतून रोड शो करतील. रोड शोची रंगीत तालीम गुरुवारी (ता. ११) सकाळी घेण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्या रोड शो वाहनाच्या पुढे एक विशेष पथकाचे वाहन आणि मोदी यांच्या वाहनाच्या पाठीमागे सुरक्षा पथकांची वाहने असणार आहे

A color rehearsal going on in the background of the road show on Aurangabad Road.
PM Modi In Nashik : मोदीमय वातावरणासाठी गिरीश महाजनांची शाळा; सभास्थळी नेतागिरी न करण्याचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

रोड शोसाठी पोलिसांनी रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेटिंग केली आहे. या मार्गावर दुभाजकांची रंगरंगोटी आणि चौकांमध्ये झेब्रा पट्टे आखले आहेत. या संपूर्ण दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर पोलिसांचा गुरुवारपासूनच चोख बंदोबस्त लावला आहे.

मैदानावर तीन हेलिपॅड

निलगिरी बाग मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर उतरणार आहे. या ठिकाणी तीन हेलिपॅड तयार करण्यात आलेले आहेत. मैदानाला चोहोबाजूने बॅरिकेटिंग करून पोलिसांसह विशेष कमांडो पथकांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

रोड शोच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद रोड, तपोवन रोडवर रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्यांवर फुलांच्या माळा टाकलेल्या आहेत. झेंडूच्या विविध रंगाच्या या फुलांच्या माळांनी रस्ता अक्षरश: सुगंधित अन्‌ आकर्षक झाला आहे. त्याचप्रमाणे, स्वामी जनार्दन स्वामी मठ टी पॉइंटवरील महापालिकेची कमानीवरही झेंडूच्या फुलांच्या माळा टाकण्यात आल्या आहेत.

राज्यभरातून पोलिस पाचारण

राज्यभरातून २ हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी दाखल झालेले आहेत. याशिवाय नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाचे अधिकारी व कर्मचारी असा पोलिस बंदोबस्तासाठी आहेत. असा एकूण सुमार साडेतीन हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात असणार आहे. नाशिक ग्रामीणसह पुणे, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, धुळे, जालना येथील पोलिस दलाचे अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी आले आहेत.

A color rehearsal going on in the background of the road show on Aurangabad Road.
PM Modi In Nashik : थेट गावागावांपर्यंत पोचणार पंतप्रधान मोदी यांचे भाषण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.