Nashik : तारांगणातील तारे दोन वर्षांपासून अंधारातच

कोरोनाकाळात प्रतिबंधाचा भाग म्हणून बंद केलेला हा प्रकल्प आता देखभाल दुरुस्तीअभावी बंद आहे.
Nashik Tarangan
Nashik Taranganesakal
Updated on

नाशिक : विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याच्या उद्देशाने नाशिक महापालिकेने यशवंतराव चव्हाण तारांगण सुरू केले. मात्र, कोरोनाकाळात प्रतिबंधाचा भाग म्हणून बंद केलेला हा प्रकल्प आता देखभाल दुरुस्तीअभावी बंद आहे. त्यामुळे निर्बंध उठूनही तारांगणातील तारे काही चमकलेले नाहीत.

महापालिकेने १९९९- २००० आर्थिक वर्षात साडेसहा कोटी रुपये खर्चून तारांगण उभारले. अवकाशाविषयीच्या जागरुकतेमुळे तारांगण बालगोपाळ चिमुरड्यांसह थोरामोठ्यांच्या दृष्टीने कायमच आकर्षणाचा विषय राहिला आहे. परिणामी, सुरवातीपासून नाशिककर नागरिकांचा प्रतिसाद लाभला. तारांगणात विविध शो दाखवून त्यातून अवकाशीय माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. वेगवेगळ्या भाषेतील या शोमुळे सोप्या भाषेत खगोल शास्त्राविषयी उत्सुकता जाणून घेण्यास मदत होते. त्यात अवकाशीय माहिती वाढवीत जाण्याची गरज आहे.

Nashik Tarangan
स्मार्ट रोडची झाली वाट बिकट; नाशिककरांना मनस्ताप

कोरोनाची लागण

दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधाचा भाग म्हणून तारांगणाला कुलूप लागले. जणू कोरोनाची लागण झाली. तेव्हापासून तारांगण बंद आहे. येथील बॅटरी नादुरुस्त आहे. इतरही काही किरकोळ तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे कुलूपबंद तारांगणातील तारे कधी चमकणार हा प्रश्न आहे. कोरोना निर्बंधांमुळे प्रकल्प बंद केला. तेव्हापासून म्हणजे सुमारे दोन वर्षांपासून प्रकल्पाला कुलूप असल्याने येथील यंत्रणा धूळखात पडली. कोरोना निर्बंध हटले, तरी तारांगणातील तारे चमकलेच नाहीत.

शो अद्ययावत व्हावे

तारांगणात विविध भाषेतून शो दाखवतात. जगभर विज्ञानात रोज नवनवीन शोध लागून झपाट्याने क्रांती होत असताना, तारांगणात नियमितपणे अद्ययावत माहिती दाखविली गेली पाहिजे. तारांगणात तेच तेच शो दाखविले जातात, हा प्रमुख आक्षेप आहे. महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी तारांगणाच्या विषयात लक्ष घालून अद्ययावत माहितीसह तारांगण नव्या रूपात साकारण्यासाठी पुढाकार घेतला, तर पुन्हा तारांगण फुललेले पाहायला मिळू शकेल, असे अवकाशप्रेमींची मागणी आहे.

Nashik Tarangan
तुम्हाला जर का अपचन, गॅस याचा त्रास असेल तर जेवणानंतर करा ही ५ योगासनं

दृष्टिक्षेपात...

- महापालिकेचा वैज्ञानिक प्रकल्प

- उत्तर महाराष्ट्रातील एकमेव तारांगण

- एकाचवेळी १०५ आसनक्षमता

- रोज तीन खेळ दाखविण्‍याची सोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.