पंचवटी : येळकोट येळकोट, जय मल्हार...., सदानंदाचा येळकोट....भंडाऱ्याची उधळण करत, खंडोबाची काठी व घोडा नाचवत अवघे वातावरण चैतन्यमय झाले होते.
खंडोबाचा जयघोष करीत पंचवटीचा मल्हारी राजा चंपाषष्ठीनिमित्त पेठ रोडला बारागाड्या कार्यक्रम साजरा करण्यात आला. (tasteful procession of horse stick flag palanquin occasion of Champa shashti program of pulling baragats on Peth Road nashik)
चंपाषष्ठी उत्सवानिमित्त सोमवारी (ता. १८) पहाटे पाच वाजता श्री खंडेराव महाराज स्नान व अभिषेक व आरती करण्यात आली. सकाळी नऊ वाजता खंडेराव कुंड येथून यात घोडा, काठी, ध्वज, पालखी सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली.
सायंकाळी ६ वाजता पंचवटीचा मल्हारी राजा पेठ रोडवरील खंडेराव मंदिर येथे बारागाड्या ओढण्यात आल्या. खंडेरायाचे भक्त रवींद्र निकम यांनी या बारागाड्या व तेरावा रथ ओढला. या ठिकाणी रात्री जागरण गोंधळ घालण्यात येऊन, पारंपरिक बोहडाचा कार्यक्रम पार पडला.
शारदा, गणपती, खंडोबा, वेताळ, वीरभद्र, रावण, नरसिंह आदी देवदेवतांची सोंगे नाचावण्यात येतात. सकाळी लंगर तुटल्यावर देवी आणि म्हसोबाची लढाई होऊन उत्सवाची सांगता केली जाते.
बारागाड्या ओढण्याचे हे १४ थे वर्ष असून गेल्या सोळा वर्षापासून या ठिकाणी सालाबादप्रमाणे भरत असते. प्राचीन काळी खंडोबाला मरीआईचा गाडा आडवा आल्याने खंडोबाने तो ओढला असल्याचे पुराणात वर्णन असून, त्याची आठवण म्हणून यादिवशी बारा गाड्या ओढण्यात येत असतात.
काही सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांनी एकूण बारा बैलगाड्या पंचवटी खंडोबा महाराज देवस्थान ट्रस्टला उपलब्ध करून दिल्या आहे. त्या बांधण्याचे काम रवींद्र निकम यांचे शिष्य यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी उत्सव समिती अध्यक्ष स्वप्नील ओढाणे, उपाध्यक्ष मयूर डोंगरे, कार्याध्यक्ष आनंद जाधव, उपकार्याध्यक्ष स्वप्नील गवळी, खजिनदार नीलेश पवार, सचिव अमर मुर्तडक, संघटक विलास गिते, प्रसिद्धिप्रमुख अक्षय केदार, मनोज धुमाळ, सनी गंगावणे, राकेश कोठुळे, गणेश शेटे, संदीप सपकाळ, सुनील गायकवाड, सौरभ वाल्मीक, गणेश कोठुळे, रमेश कोठुळे, नंदू पवार यांनी परिश्रम घेतले.
या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वाहतूक सुरळीत राहावी व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये बंदोबस्तास्तासाठी पंचवटी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी, रोहित केदार व पोलिस कर्मचारी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.