Nashik News : SMBT हॉस्पिटलमध्ये वयोवृद्ध महिलेवर तावी शस्रक्रिया यशस्वी! ओपनहार्ट सर्जरीला पर्याय

एसएमबीटी हॉस्पिटलच्या हृदयविकार विभागाचे संचालक आणि वरिष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा व त्यांच्या टीमने ही शस्रक्रिया पार पाडली.
SMBT Hospital
SMBT Hospitalesakal
Updated on

नाशिक : नाव यमुनाबाई. वय ७२ रा. नाशिक. गेल्या काही दिवसांपासून आजींना श्वसनाचा त्रास जाणवत होता. नातेवाइकांनी त्यांना बऱ्याच रुग्णालयामध्ये दाखल केले. आजींना हृदयाचा त्रास त्यात वय अधिक यामुळे त्यांच्यावर उपचार करणे हाय रिस्क असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर त्यांनी मुंबईत उपचारासाठी धाव घेतली.

त्यानंतर त्यांना तावी शस्रक्रिया यावर पर्याय असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मुंबईत असणाऱ्या किमती पाहून नातेवाईक आणखीनच संकटात आले. दरम्यान, एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये ही शस्रक्रिया होते असे समजल्यानंतर त्यांनी थेट एसएमबीटी हॉस्पिटल गाठले.

अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या वयोवृद्ध महिलेवर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये ट्रान्सकॅथेटर आओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन (तावी) शस्रक्रिया यशस्वी करण्यात आली. (Tavi operation on an elderly woman in SMBT Hospital successful alternative to open heart surgery Nashik News)

एसएमबीटी हॉस्पिटलच्या हृदयविकार विभागाचे संचालक आणि वरिष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा व त्यांच्या टीमने ही शस्रक्रिया पार पाडली.

अधिक माहिती अशी की, वयोवृद्ध महिला यमुनाबाई व्यवहारे (रा. नाशिक) यांना शस्त्रक्रिये आधी महिनाभरापासून धाप लागणे, अशक्तपणा, अंधारी येणे, छातीत अस्वस्थ वाटणे आणि झोपेतून सतत जाग येणे अशी लक्षणे जाणवत होती.

रुग्णाच्या कुटुंबीयांनी त्यांना नाशिकमधील अनेक हॉस्पिटल व मुंबईतही उपचारासाठी दाखल केले मात्र वय अधिक असल्याने डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी तयार होत नव्हते. या दरम्यान, त्यांनी नाशिकमध्ये त्यांच्या अनेक चाचण्या करून घेतल्या होत्या.

SMBT Hospital
Fatty liver Disease : फॅटी लिव्‍हरचे 35 टक्‍के नागरिक शिकार..! जीवनशैलीतील बदल कारणीभूत

त्यांच्या टू-डी एको कार्डिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये त्यांना तीव्र स्वरूपाचे आओर्टिंक स्टेनोसिस असल्याचे निदान झाले. या स्थितीमध्ये महारोहिणीच्या झडपेच्या झापा काही अडथळ्यामुळे नीट उघडत नाहीत.

रक्तप्रवाहामध्ये आलेल्या या अडथळ्यामुळे हृदयास प्रचंड त्रास होत होता व यामुळे त्यांचे हृदय कमकुवत झाले होते. या सर्व लक्षणांना हृदयातील डावे नीलय निकामी होणे असेही म्हटले जाते, असे डॉ वर्मा यांनी सांगितले.

SMBT Hospital
Nashik News : अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर मिरर! कळवणला संकल्प ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.