Nashik News : ग्रामस्थ भरणार घरबसल्या पाणी-घरपट्टी; ग्रामपंचायतींना क्यूआर कोड सक्तीचा

Tax can be paid online at Gram Panchayat level nashik news
Tax can be paid online at Gram Panchayat level nashik newsesakal
Updated on

Nashik News : राज्यातील महापालिका आणि नगर परिषदांनी विविध कर भरण्यासाठी क्यूआर कोड, गुगल पे यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना रांगेत उभे राहण्यापेक्षा ऑनलाइन पद्धतीने कर भरता येतो.

याच धर्तीवर आता ग्रामपंचायतीच्या पातळीवरही ऑनलाइन कर भरता येणार आहे. यासाठी राज्यातील ग्रामपंचायतींना १५ ऑगस्टपासून क्यूआर कोड सक्तीचा करण्यात आला असून, या कोडच्या माध्यमातून ग्रामस्थांना घरबसल्या विविध कर भरता येणार आहेत.

केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयातर्फे याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. राज्याच्या ग्रामविकास विभागाने हे आदेश सर्व जिल्हा परिषदांना काढले. (Tax can be paid online at Gram Panchayat level nashik news)

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून, ‘मेरी मिट्टी- मेरा देश’ अभियानांतर्गत १५ ऑगस्टपासून सर्व ग्रामपंचायतींनी क्यूआर कोडद्वारे करवसुली मोहीम राबवावी, असे आदेश दिले आहेत.

रत्नागिरी जिल्हा परिषदेत प्रायोगिक तत्त्वावर क्यूआर कोडचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. रायगड जिल्ह्यातील चेंढरे ग्रामपंचायतीने प्रायोगिक तत्त्वावर क्यूआर कोडचा वापर करीत, गावातील सर्व ग्रामस्थांच्या घरावर क्यूआर कोड लावला. या माध्यमातून घरपट्टी, पाणीपट्टीसह विविध करांचा भरणा करण्याचे आवाहन केले.

हा प्रयोग यशस्वी झाल्यावर केंद्राच्या पंचायतराज विभागाने सर्वत्र यांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेत, त्याबाबतचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतींचा आर्थिक व्यवहार पारदर्शक व अधिकाधिक डिजिटल होण्यासाठी यूपीआय व क्यूआर कोडचा वापर यातून वाढविला जाईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Tax can be paid online at Gram Panchayat level nashik news
Lumpy Skin Disease : जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा विळखा! पशुसंवर्धन विभाग अलर्ट

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ग्रामपंचायतींचे कामकाज आधुनिक बनविण्याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन दाखले देण्याचे काम सुरू झाले असताना या क्यूआर कोडच्या माध्यमातून करभरणा करता येईल.

यासाठीच १५ ऑगस्टपासून सर्व ग्रामंपचायती डिजिटल करून, ग्रामपंचायतींना पॉस मशिनही देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्वनिधीचे खाते असलेल्या बँकेकडे क्यूआर कोडची मागणी करण्याच्या सूचना द्याव्यात, अशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना करण्यात आल्या आहेत.

यूपीआय, क्यूआर कोडचे फायदे

- ग्रामस्थांना घरात बसून पाणीपट्टी आणि घरपट्टी भरता येणार

- नागरिकांना रांगेत उभे राहण्यापेक्षा ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा

- घरपट्टी व पाणीपट्टी वसुली वेळेत होण्यास मदत

- ग्रामपंचायतींचे व्यवहार कॅशलेस, पेपरलेस होण्यास मदत; अपहार होण्याची भीती कमी

- ग्रामपंचायतींच्या कामात पारदर्शकता येणार

Tax can be paid online at Gram Panchayat level nashik news
Nashik News : जागृत देवस्थान असलेल्या येवल्यातील शिवमंदिरात नागाचे दर्शन; श्रावणातील दर्शनामुळे कुतुहल

तांत्रिक अडचणी

- ग्रामपंचायतींनी क्यूआर कोड, यूपीआय ग्रामस्थांना दिला. मात्र, यात काही बदल केल्यास पाणी-घरपट्टीची रक्कम दुसऱ्यांच्या खात्यावर जाण्याचा धोका असून, ग्रामस्थांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

- ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने सर्वांनाच त्यांचा वापर शक्य नाही

- क्यूआर कोड, यूपीआय यांच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम नेमकी कोणाची हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लक्षात येणे अवघड आहे

- ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांच्या बदल्या होत राहतात, गावात उपस्थित नसतात. त्यामुळे भरणाची माहिती होण्यास अडसर

- खोटा क्यूआर कोड, यूपीआयचा वापर होण्याचा धोका

Tax can be paid online at Gram Panchayat level nashik news
Nashik BSNL 4G : नॉट रिचेबल 69 दुर्गम गावात ‘बीएसएनएल’ची 4 जी टॉवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.