Tax Deduction Scheme : चालू बिलावर 2 टक्के दंड आकारला जाणार

tax deduction scheme penalty of 2 percent will be levied on current bill nashik news
tax deduction scheme penalty of 2 percent will be levied on current bill nashik newssakal
Updated on

Tax Deduction Scheme : करसवलतीची तिमाही योजना संपुष्टात आल्यानंतर आता मालमत्तेच्या चालू बिलावर दोन टक्के दंड आकारला जाणार आहे.

दरम्यान, सवलतीच्या तिमाहीत जवळपास ९१ कोटी रुपयांचा महसूल महापालिकेला झाला आहे. तीन महिन्यात झालेली विक्रमी वसुली मानली जात आहे. (tax deduction scheme penalty of 2 percent will be levied on current bill nashik news)

२०२३ व २४ या आर्थिक वर्षासाठी महापालिका प्रशासनाने मालमत्ता करातून २१० कोटी रुपयांची उद्दिष्ट निश्चित केले आहे . एप्रिल, मे व जून या तीन महिन्यासाठी महापालिकेकडून करसवलत योजना लागू केली आहे. घरपट्टीची आगाऊ रक्कम जमा केल्यास एप्रिल महिन्यात आठ टक्के, मे महिन्यात सहा टक्के, तर जून महिन्यात तीन टक्के अशी सवलत देण्यात आली होती.

एप्रिल महिन्यात सवलत योजनेतून ५१ कोटी ८० लाख रुपये महापालिकेला महसूल प्राप्त झाला. मे महिन्यात १४ कोटी चार हजार रुपये, तर जून महिन्यात २५ कोटी ३९ लाख रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहे. पहिल्या तीन महिन्यात ९० कोटी ७७ लाख रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

tax deduction scheme penalty of 2 percent will be levied on current bill nashik news
Income Tax: कर भरण्यात टाटा नंबर 1, 'या' 10 कंपन्यांनी भरली सर्वाधिक तिजोरी

सव्वादोन लाख करदात्यांकडून भरणा

नाशिक महापालिका हद्दीमध्ये जवळपास पावणेपाच लाख मालमत्ताधारक आहे. सवलतीच्या योजनेत एकूण दोन लाख सोळा हजार करदात्यांनी योजनेचा लाभ घेतला. एप्रिल महिन्यात एक लाख २७ हजार ९६५, तर मे महिन्यात २९ हजार ६९५ करदात्यांनी आगाऊ मालमत्ता कर अदा केला. जून महिन्यात ५८ हजार ५८८ लाभार्थ्यांनी करसवलतीचा लाभ घेतला.

करसवलत योजनेतून तीन कोटी ६३ लाख ९१ हजार ५८२ महापालिकेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ३० जून ही करसवलतीची अखेरची तारीख होती. १ जुलैपासून मालमत्ताधारकांच्या चालू बिलावर किंवा थकबाकीदारांवर दोन टक्के दंड लागू होणार आहे, अशी माहिती कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दिली.

tax deduction scheme penalty of 2 percent will be levied on current bill nashik news
Income Tax: परदेशी फिरायला गेले अन् सोशल मीडियावर फोटो टाकून फसले, आली आयकर विभागाची नोटीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.