Tax Recovery : पूर्व विभागाकडून सुटीच्या कारवाईत 5 लाखांची वसुली

Officers of Eastern Division in recovery of dues from defaulters.
Officers of Eastern Division in recovery of dues from defaulters. esakal
Updated on

जुने नाशिक : पूर्व विभागाकडून शनिवार, रविवार या दोन सुटीच्या दिवशी थकबाकीदारांकडून सुमारे ५ लाख १७ हजारांची वसुली करण्यात आली. तसेच थकबाकी न भरणाऱ्यांना काही दिवसात थकबाकी भरण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या.

मार्चअखेरपर्यंत अशा प्रकारची धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (Tax Recovery of 5 lakhs from East Division office on holiday nashik news)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Officers of Eastern Division in recovery of dues from defaulters.
RTE Admission : आरटीई प्रवेश ऑनलाइन अर्ज दाखलसाठी 17 मार्चपर्यंत मुदत

पूर्व विभागीय कार्यालयाकडून शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता.२६) या दोन्ही दिवशी सुटी असतानादेखील विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक चंदन घुगे यांच्यासह भरत गोंधळे, दिलीप कळमकर, विष्णू कुंटे, कैलास भागवत, हुसेन सय्यद, मुकुंद कटारे, राजेश सोनवणे, मोहन भांगरे यांचे पथक तयार करून भद्रकाली येथील कापड मार्केट, कठडा मार्केट, फुले मार्केट अशा विविध मार्केटमधील थकबाकीदार व्यावसायिकांकडून थकबाकी वसुली करण्यात आली.

या सर्व मार्केटमध्ये सुमारे ४६५ गाळे आहेत. त्यापैकी शनिवारी ६८ गाळेधारकांकडून २ लाख ६९ हजार ८९९ रुपयांची वसुली केली. तर रविवारी ५९ गाळेधारकांकडून २ लाख ४७ हजार ३८३, अशाप्रकारे दोन सुटीच्या दिवशी १२७ गाळेधारकांकडून सुमारे ५ लाख १७ हजार २८२ थकबाकी वसुली करण्यात आली.

अन्य थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहे. नोटिशीमध्ये नमूद केलेल्या मुदतीत थकबाकी न भरल्यास त्यांच्यावर गाळे सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Officers of Eastern Division in recovery of dues from defaulters.
Nashik Bribe Crime : सहकार विभागाचा सहाय्यक निबंधक 15 हजारांची लाच स्वीकारताना ACBच्या जाळ्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.