Nashik News: शिक्षक समितीचे 15 जुलैला राज्यव्यापी आंदोलन; प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

agitation
agitation esakal
Updated on

Nashik News : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांबाबत सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याच्या निषेधार्थ राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे शनिवारी (ता.१५) रोजी संपूर्ण राज्यात जिल्हास्तरावर धरणे-निदर्शने आंदोलन केले जाणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली. (Teacher Samiti statewide protest on July 15 Ignorance of government towards demands of primary teachers Nashik News)

राज्यातील इतर सरकारी, निमसरकारी कर्मचारी व अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असणाऱ्या शासनाकडून जिल्हा परिषद व नगर पालिका, महानगर पालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांच्या बाबतीत शासन संवेदनशील नाही.

शासनाकडून सातत्याने सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याची टीका श्री. कोंबे, उदय शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केली आहे.

शिक्षकांना मुख्यालयात निवासाची कोणतीही व्यवस्था नसताना मुख्यालयाच्या नावाखाली घरभाडे भत्ता कपात केला जातो. सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे चार हप्ते दिले. प्राथमिक शिक्षकांना अद्याप दुसराही हप्ता मिळालेला नाही.

नगरपालिका, महापालिका शिक्षकांना वेतन आयोगाचीच थकबाकी अजूनही मिळालेली नाही. वैद्यकीय प्रतिपूर्ती आणि प्रवास भत्त्यासाठी अनुदान दिले जात नाही. शिक्षकांची हजारो पदे रिक्त असून काही शाळांत एकही शिक्षक नसण्याची स्थिती आहे.

दुसऱ्या शाळेतील शिक्षकांच्या माध्यमातून तात्पुरती व्यवस्था करण्यात येत असून गुणवत्तेचा ऱ्हास होत असताना शिक्षकांना जबाबदार धरून बदनामी केली जात आहे. अनेक जिल्ह्यांत कंत्राटी शिक्षण सेवकांच्या जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरण्याची तात्पुरती मलमपट्टी केली जात असून यामुळे भविष्यात वेठबिगारी शिक्षक स्वयंसेवक नियुक्तीची पद्धत सुरू होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

agitation
Nashik News: इगतपुरी आगाराचे वेळापत्रक कोलमडले! भरपावसात शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल

वरिष्ठ प्राथमिक वर्गांना गणित-विज्ञान शिक्षकांना पदवी धारण करण्याची संधी देणे आवश्यक असताना मध्येच पदावनत करण्याचे धोरण चुकीचे आहे. विधीमंडळात आश्वासन देऊनही शिक्षकांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे.

मंत्री, वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवेदने देऊनही कोणत्याही मागणीची सोडवणूक केली जात नसल्याचा आक्षेप समितीने नोंदवला आहे.मागण्यांच्या सोडवणुकीसाठी असलेल्या अनास्थेमुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्याविरोधात आंदोलन करणे अपरिहार्य झाले आहे.

या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य नेते उदय शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राजन सावंत, आनंदा कांदळकर, विलास कंटेकुरे, सयाजी पाटील, नंदकुमार होळकर, राजेश सावरकर, नितीन नवले, किशन बिरादार, किशोर पाटील, सतीश सांगळे, प्रफुल्ल पुंडकर, सय्यद शफीक अली, वर्षा केनवडे, सुधाकर सावंत, अर्जून पाटील, श्याम राजपूत, बळिराम मोरे, किशोर डोंगरवार, सुनील भामरे, गजानन गायकवाड आदींनी केले आहे.

agitation
Nashik News: राजस्थानच्या सेंधा, काळ मीठाला मालेगावात मागणी; दररोज 200 किलो मिठाची विक्री!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.