Nashik News : शिक्षक सतीष पैठणकरांनी परत केले 80 हजार रुपये

तळवाडे विद्यालयातील शिक्षक सतीश पैठणकर यांनी नजरचुकीने आपल्या बँक खात्यात आलेले ८० हजार रुपये परत करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
Teacher Satish Paithankar returned 80 thousand rupees nashik news
Teacher Satish Paithankar returned 80 thousand rupees nashik newsesakal
Updated on

Nashik News : तळवाडे विद्यालयातील शिक्षक सतीश पैठणकर यांनी नजरचुकीने आपल्या बँक खात्यात आलेले ८० हजार रुपये परत करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ नगरसुल संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल तळवाडे (ता. येवला) विद्यालयातील कला शिक्षक सतीश पैठणकर यांनी उभा केला आहे. (Teacher Satish Paithankar returned 80 thousand rupees nashik news)

तेलंगणा राज्यातून नजरचुकीने श्री. पासून हनुमंत या व्यक्तीकडून नजर चुकीने ८० हजार रुपये श्री. पैठणकर यांच्या खात्यावर जमा झालेली ही रक्कम कशी आणि कुठून आली या विचाराने त्यांना अस्वस्थ केले.पोलिसांकडे जाऊन या संदर्भात माहिती द्यावी असाही विचार मनात आला.

त्याचवेळी श्री. हनुमंत यांनी तेलंगणाहून श्री. पैठणकर यांच्याशी संपर्क साधून ही रक्कम आपली नसून ती परत करण्याची विनंती केली. त्या विनंतीला श्री. पैठणकर यांनी तत्काळ होकार दर्शविला. मात्र दुसऱ्या राज्यातील विषय असल्याने त्यांनी पोलिसांच्या सल्ल्याने जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सहकारी शिक्षक विनोद निकम यांच्या सोबत त्यांनी शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक श्री. पुजारी यांची भेट घेऊन सर्व हकिगत सांगितली.

Teacher Satish Paithankar returned 80 thousand rupees nashik news
Nashik News : बांधकाम विभागाकडून 15 फेब्रुवारीपर्यंत 40 आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याची तयारी

सदरचे पैसे मला परत करायचेच आहे, मात्र ते रीतसर आणि योग्य पद्धतीने परत जायला हवे ही इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार श्री.पुजारी यांनीही तेथील पोलिसांची संपर्क साधून घडलेल्या घटनेचे वास्तव समजून घेत श्री. हनुमंता यांचीच रक्कम असल्याचे लक्षात आल्यानंतर सदरचे पैसे श्री. पैठणकर यांनी परत केली आहे. नजरचुकीने फोन पे वर आलेले पैसेही आजकाल परत देण्यास कोणी धजत नाही.मात्र अवघ्या काही मिनिटातच आपले पैसे परत मिळाल्याने श्री. हनुमंत यांनीही आभार मानले.

या प्रामाणिकपणाबद्दल पोलिस निरीक्षक श्री. पुजारी यांनी सतीश पैठणकर तसेच विनोद निकम यांचा श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करत कौतुकही केले. तसेच नगरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस प्रमोद पाटील, सरचिटणीस प्रवीण पाटील, माजी सरपंच प्रसाद पाटील, तळवाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एच.अहिरे आदींनी पैठणकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत अभिनंदन केले.

Teacher Satish Paithankar returned 80 thousand rupees nashik news
Nashik News : ज्‍येष्ठ साहित्‍यिक उत्तम कांबळेंना कवी सिद्धलिंगय्या पुरस्कार प्रदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.