Nashik News : संवेदनशील शिक्षकांमुळे कोकिळला मिळाले जीवदान!

teacher save life of cuckoo bird nashik news
teacher save life of cuckoo bird nashik newsesakal
Updated on

Nashik News : रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या मादी कोकीळ पक्षाला घरी आणून त्याचा रात्रभर सांभाळ करत प्राथमिक शिक्षक बाजीराव सोनवणे यांनी त्याला जीवदान दिले आहे. (teacher save life of cuckoo bird nashik news)

दुसऱ्या दिवशी हा पक्षी मनसोक्तपणे सहकाऱ्यांसोबत उडाला. श्री. सोनवणे यांना रात्री एक मादी कोकीळ रस्त्याच्या कडेला धडपड करताना दिसली. त्यांनी तत्काळ निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळ कार्यकर्ते माधव पिंगळे यांना ही बाबा सांगितली. श्री. सोनवणे व पिंगळे यांनी पाणी पाजण्याचा प्रयत्न केला पण ते प्रतिसाद देत नव्हते.

पक्षी मित्रांची चौकशी केली पण कोणीही मिळून आले नाही. या पक्ष्याला रात्री तसेच टोपली खाली झाकून ठेवल्याने कोकीळ सकाळपर्यंत शांत झोपला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

teacher save life of cuckoo bird nashik news
Nashik News : मतदार नोंदणी जागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

सकाळी पुन्हा फडफड चालू झाल्याने बरे वाटले. त्याला गच्चीवर घेऊन गेल्यावर आजूबाजूला कोकीळ पक्षाचा आवाज येत होता. याचा कानोसा घेऊन त्याने जोराने झेप घेतली.

काही क्षणात मोठ्‌या वडाच्या झाडावर पोचला. हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसला अन एका पक्षाला जीवदान मिळाल्याचा आनंद वाटल्याचे पिंगळे यांनी सांगितले. याकामी बाजीराव सोनवणे, ऋषी सोनवणे, विकास पिंगळे, माधव पिंगळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

teacher save life of cuckoo bird nashik news
Success Story : वर्दीचे स्वप्न पाहून मिळविली मानाची ‘रिव्हॉल्व्हर’! अभिजित यांनी नोंदविला अकादमीत अनोखा विक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()