Teacher Vacancy : राज्यात उर्दू शिक्षकांची 3 हजार पदे रिक्त

Transfer of 21 thousand more teachers  Fourth list announced education
Transfer of 21 thousand more teachers Fourth list announced education esakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक (ZP) शाळेतील मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. (teacher vacancy large number of teachers posts are vacant in zp Primary School malegaon nashik news)

दरम्यान विधानपरिषदेत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी येत्या दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. उर्दू प्राथमिक शिक्षकांची तीन हजार बारा पदे रिक्त असून या भरतीत उर्दू शिक्षक पदे भरण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी शासनाकडे केली आहे.

राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नियंत्रणाखाली २२ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. सदर परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षक रिक्त पदांची भरती पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध होईल.

त्या करिता राज्यात प्रस्तावित ३० हजार शिक्षक भरतीत अल्पसंख्याक समाजातील डीएड- बीएड धारक बेरोजगारांना न्याय मिळवा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यातील अनेक शाळेत रिक्त पदे असल्याने दोन- तीन वर्गाचे अध्यापन कार्यरत शिक्षक यांना करावे लागत आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Transfer of 21 thousand more teachers  Fourth list announced education
NDA Exam : सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षणाच्‍या अर्जाची या तारखेपर्यंत मुदत; प्रवेशासाठी येथे करा अर्ज..

पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या भरतीत उर्दू माध्यमाच्या एकूण जागांमध्ये इतर घटकाप्रमाणे ईवीएस व खुला या दोन्ही प्रवर्गाला जागा उपलब्ध करून द्याव्यात. राज्यात अनेक वर्षानंतर शिक्षक भरती प्रस्तावित आहे म्हणून उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये रिक्त असणारे सर्व पदे भरण्याची गरज आहे. संघटनेतर्फे या भरती व अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी राज्यभरात अनेकवेळा आंदोलन केले होते.

उर्दू शिक्षक भरती करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे व परिक्षा आयुक्त महेश फालक यांना देण्यात आली असल्याची माहिती श्री साजिद यांनी दिली.

राज्यात उर्दू माध्यम शाळांचे रिक्त पदे

सर्व संवर्ग निहाय जिल्हा परिषद: १३०१

खुले प्रवर्ग जिल्हा परिषद:४०८

सर्व महानगरपालिका:८८१

नगरपालिका: ४२२

एकूण : ३०१२

"राज्यातील शिक्षक भरती समवेत उर्दू शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. उर्दू शिक्षण घेतलेले मोठ्या प्रमाणावर बेरोजगार आहेत." - झिया उर रहेमान. जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती उर्दू आघाडी

Transfer of 21 thousand more teachers  Fourth list announced education
Nashik News : गुजरात सरकारची कांदा-बटाटा उत्पादकांना 330 कोटींची मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()