Teacher News: थकीत बिले देता का बिले... गुरुजींचे अडकले 64 कोटी! जिल्ह्यातील शिक्षकांना हक्काचे पैसे मिळेना

While giving a statement to the Director of Education, Sampat Suryavanshi, S. B. Deshmukh and officials.
While giving a statement to the Director of Education, Sampat Suryavanshi, S. B. Deshmukh and officials.esakal
Updated on

Teacher News : आज ना उद्या वेतन सुरू होईल आणि केलेल्या कामाचा मोबदलाही मिळेल... या अपेक्षेवर अनेक शिक्षक वर्षानुवर्षे विनावेतन काम करतात. सेवेत समाविष्ट झाल्यानंतर ही बिले मिळाली पाहिजेत.

मात्र वेतनाची थकीत बिले शिक्षण विभागाने दिलीच नसल्याने सात वर्षांपासूनची ६४ कोटींची बिले मंजूर होऊनही ती निधीअभावी पडून आहेत. (teachers 64 crores stuck Teachers in district do not get their rightful money nashik news)

नुकतेच नवनिर्वाचित शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्यासोबत महाराष्टू राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाची बैठक पुणे येथे झाली. या वेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष एस. बी. देशमुख यांनी प्रामुख्याने हा मुद्दा उपस्थित करून लक्ष वेधले.

६४ कोटींची बिले मंजूर होऊन निधीअभावी ती पडून आहेत, तर ३२ कोटींची बिले शिक्षण उपसंचालकांच्या चौकशीत अडकली आहेत. २६ कोटी रुपयांची रजा रोखीकरणाची बिले ट्रेझरीत अडकली आहेत.

ही बिले गेल्या महिन्यापासून ट्रेझरीत का पडून आहे, याचे कारणही कळेना. त्यामुळे पाठपुरावाही करता येत नसल्याचे चित्र आहे. यात शिक्षक पूर्णपणे भरडले जात असून, शिक्षकांचा दोष काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची फरक बिले निघाली नाहीत. कोविड काळापासून अजूनही ही बिले अडकलेली आहेत. कोविड काळात आमच्या शिक्षकांचे कुणाचे आई-वडील, नातेवाईक दगावले, हे दुःख आहेच.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

While giving a statement to the Director of Education, Sampat Suryavanshi, S. B. Deshmukh and officials.
Nashik: कोतवाल भरतीसाठी आता लेखी परीक्षा अन आरक्षण! मानधन, अधिकार अन संख्या वाढल्याने झाले मानाचे पद

त्यात काहींच्या मुला-मुलींचे लग्न, शिक्षण, आई-वडिलांचे आजारपण हे सर्व फरक बिलांवर अवलंबून असतांना फरक बिल मात्र निघत नाही. पाठपुरावा करूनही आश्वासने दिली जातात. मात्र मेअखेर ही बिले मिळाली नाहीत, तर सर्व संघटना एकत्र येऊन शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन करतील, असा इशारा श्री. देशमुख यांनी दिला.

यावेळी २०, ४०, ६०, ८० टक्के शिक्षकांचे फरक बिल, पगार वेळेवर व्हावा, निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक यांचे निवृत्तीचे लाभ निवृत्तीच्या दिवशीच त्यांना मिळावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करावी हे विषय झाले.

याला शिक्षण संचालक सूर्यवंशी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे, दत्तात्रय कदम, राजेंद्र सूर्यवंशी, रवींद्र काकड, शिवाजी पाटील, एम. एन. पाटील उपस्थित होते.

While giving a statement to the Director of Education, Sampat Suryavanshi, S. B. Deshmukh and officials.
Kharif Crop: दिंडोरी तालुक्यात 18 हजार हेक्टरवर खरिपाचे उद्दिष्ट; खरीप पेरणीपूर्व मशागतींच्या कामास सुरवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.