Teacher Special Train : मध्य रेल्वेतर्फे उन्हाळी विशेष गाड्यांसोबतच शिक्षक विशेष रेल्वे गाडी चालविली जाणार आहे. या गाड्यांचा तपशील असा : मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस स्पेशल या गाडीच्या चार फेऱ्या होतील. पैकी ०११०१ ही गाडी एलटीटीहून २ मेस दुपारी सव्वाबाराला सुटेल. बनारस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी चारला पोचेल. (Teachers Special Train for Mumbai to Banaras nashik news)
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
०११०२ स्पेशल ३ मेस सायंकाळी सहाला बनारसहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजून ५५ मिनिटांनी एलटीटी येथे पोचेल. ०११०३ ही गाडी एलटीटीहून ६ मेस दुपारी सव्वाबाराला सुटेल, तर ०११०४ ही विशेष गाडी ७ मेस सायंकाळी सहाला बनारसहून निघेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजून ५५ मिनिटांनी पोचेल.
ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छिवकी येथे ही गाडी थांबेल. एक प्रथम, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, दहा शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह चार जनरल बोगी असतील.
ट्रेन क्रमांक ०११०१ आणि ०११०४ या गाड्यांच्या विशेष शुल्कासह बुकिंगसाठी मुंबई सीएसटी येथे रविवार (ता. २३)पासून काउंटरवर उघडले असून, ट्रेन क्रमांक ०११०३ साठीचे बुकिंग सोमवारी (ता. २४) सर्व संगणकीकृत केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.