Nashik Tehsildar Bribe Crime : तहसील प्रशासन आता सातच्या आत घरात! लाच प्रकरणाच्या दणक्याचा परिणाम

bribe
bribesakal
Updated on

Nashik Tehsildar Bribe Crime : तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पकडल्यानंतर तात्पुरत्या काही स्वरूपात तरी तहसील कार्यालयातील वातावरण बदलल्याचे चित्र आहे. (tehsildar bribe crime rules of conducting business in tehsil office after 7 in evening stopped for some days nashik news)

एरवी दिवसभर कार्यालयात न थांबता कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सायंकाळी सातनंतर तहसील कार्यालयात कामकाज चालवायचे हा अलिखित नियम काही दिवसांपासून बंद पडला आहे.

शासकीय सेवेत नसतानाही तहसील कार्यालयातील कर्मचारी असल्याचे भासवत सामान्यांना लुटत चकरा मारण्याचा त्रास कमी करीत जीवनमान उजळविण्याचे नाटक करणारे दलाल तूर्तास तरी गायब झाल्याचे दिसत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

bribe
Nashik Tehsildar Bahiram Bribe Case : नाशिकचा लाचखोर तहसीलदार बहिरम याचा धुळ्यात प्लॉट

लाच प्रकरणानंतर नाशिक तहसील कार्यालयात दिसणारा प्रमुख फरक म्हणजे कामकाजाच्या वेळा. नाशिक तहसील कार्यालयात एरवी सायंकाळी सातनंतर कामकाज खऱ्या अर्थाने सुरू व्हायचे. दिवसभर अधिकारी भाऊसाहेब सामान्यांना भेटणे दुर्मिळच.

सायंकाळी सामान्यांची कार्यालयात यायची वेळ संपली, की सगळे कार्यालयात अवतरून कामकाज चालवायचे, असा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू असायचा. सायंकाळी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर कामकाज सुरू करून सामान्यांना टाळायचे आणि सोयीच्या कामांवर फोकस करीत ते निकाली काढायाचे, असा प्रकार काही दिवसांपासून थांबल्याचे चित्र आहे.

bribe
Nashik Tehsildar Bahiram Bribe Case : लाचखोर बहिरम याच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर : जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.