नाशिक : नैसर्गिक आपत्तीतून (Natural Disaster Relief fund) सावरण्यासाठी शासन मदत करते. मुळातच मदतीची रक्कम अतिशय तुंटपुजी असते. मात्र, शेतकऱ्यांच्या नावाने मिळणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीच्या रकमांवरही प्रशासकीय यंत्रणेतील काही ‘भाऊसाहेब’ कसे डल्ला मारतात, याचा प्रत्यय देणारा एक प्रकार येवला (yeola taluka) तालुक्यात नुकताच उघडकीस आला.
बहुचर्चित तलाठीचे कारनामे; नैसर्गिक आपत्तीची रक्कम लांबविली
येवला तालुक्यातील एका तहसीलदाराने २०१२ ते २०१४ यादरम्यान जमीन मालक नसलेल्यांच्या नावे नुकसानीचे पंचनामे करीत, दोन ते सव्वादोन लाखांची नैसर्गिक आपत्तीची रक्कम हडपली आहे. त्यासाठी त्याने ठराविक रक्कम काही बँक खात्यांवर जमा करण्याची करामत केली. आतापर्यंत असे साधारण दहा ते बारा गैरप्रकार उजेडात आले असून, त्यातील दोन प्रकारांत तर ज्या शेतीच्या गटावरील नैसर्गिक आपत्तीची रक्कम बँक खात्यात वळविली गेली, ते गटच संबंधित गावात नसल्याचे पुढे येत आहे. त्यात प्रामुख्याने पाटोदा ९८२, ९०३ हे गट नसताना त्यावरील नैसर्गिक आपत्तीची रक्कम लांबविली गेल्याचे पुढे आले आहे.
मुळातच शासकीय मदतीची रक्कम थेट संबंधित खातेदाराच्या नावावर जमा करण्याचा नियम आहे. त्यासाठी शासनाकडून लाभार्थ्याचे आधार क्रमांक, बँक खात्याचा तपशील घेतला जातो. असे असताना अनेक खात्यांवरील मदत काही ठराविक खात्यांवर जमा करण्याचा प्रकार पुढे आल्याने हे गैरप्रकार महसूल यंत्रणेने चौकशीच्या रडारवर घेतले आहेत.
अरुण गांजरे यांच्या स्टेट बँकेतील खात्यावर (क्रमांक ३१७९९९२४९३२) वळविण्यात आलेला जमीन मालक नसलेल्यांचा निधी
शेतकरी गाव गट जमा रक्कम
शंकर कारभारी वटकर दाहेगाव पाटोदा १२४ ११७५०
गफूर अलियाना देशमुख पाटोदा ७७५ १५७६०
साहेबराव लभडे नायगव्हाण ११९ ५८५०
सरस्वती गांगुर्डे हडपसावरगाव ५२ १५९२०
---
सचिन विनायक कावरे यांच्या स्टेट बँक खात्यावर (क्रमांक ३०४१०४२५९६८) वळविण्यात आलेला निधी
नामदेव लांडवले दहेगाव पाटोदा ००९ ११७५०
ठकूबाई पावडे कुसमाडी ३६७ ७४४०
नावात गटच नाही पाटोदा ९८२ १५६००
एकनाथ निकम नायगव्हाण ६१ ९९४०
कारभारी घोडेस्वार हडपसावरगाव ५७-२ १५८४०
---
अतुल दिनकर देशमुख यांच्या खात्यावर (क्रमांक ३३४१३३०३२२०) वळविण्यात आलेला निधी
दगू पुंडलिक जाधव कुसमाडी २०९ ५९४०
गटच नाही पाटोदा ९०३ १५६००
लक्ष्मण घोडेस्वार हडपसावरगाव ५३-४ १००००
किसन पवार नायगव्हाण ४ ४४५०
महिलेच्या नावावर आठ एकर जमीन
नैसर्गिक आपत्ती लाटण्यापुरतेच गैरप्रकार मर्यादित नसून, तत्कालीन तलाठी अतुल थूल यांच्या काळात तर खंडू आहिरे व राधाकिसन कदम अशा दोन वेगवेगळ्या नावाच्या व्यक्तींची सुमारे आठ एकर जमीन अरुणा गांजरे नावाच्या एका महिलेच्या नावाने केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या व्यक्तींची अरुणा गांजरे ही एकच मुलगी कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोबतच दोन शेतकऱ्यांची जमीन ज्या महिलेच्या नावाने केली गेली, ती महिला म्हणजेच अरुणा गांजरे आणि नैसर्गिक आपत्ती ज्या खात्यावर जमा झाली ते अरुण गांजरे या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत की अरुण आणि अरुणा या दोन्ही नावांचा एकच जण आहे, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तलाठ्यांच्या चौकशी प्रकरणाने महसूल यंत्रणाही चक्रावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.