Telangana Onion Rate: BRS नेत्यांच्या दाव्याची शेतकऱ्याकडून पोलखोल! कांदा लिलाव व दराची मांडली कैफियत

Telangana Onion Rate
Telangana Onion Rateesakal
Updated on

Telangana Onion Rate : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घालून राज्यात प्रचाराचा धडाका लावला. ‘अबकी बार किसान सरकार' अशी घोषणा देण्यात येत आहे.

दरम्यान, कांद्याला भाव नसल्याने माजी आमदार आणि बीआरएसचे नेते हर्षवर्धन जाधव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. (Telangana Onion Rate Claims of BRS leaders rejected by farmer from ahmednagar exposing Onion auction and rates nashik news)

तेलंगणामध्ये महाराष्ट्रापेक्षा कांद्याला अधिक दर मिळतो, असा दावा श्री. जाधव यांनी केला होता. पुणतांबा (ता.राहाता, जि. नगर) येथील शेतकरी योगेश वाणी यांनी हैदराबादमध्ये कांदा नेला. तेथे गेल्यानंतर श्री. वाणी यांना वास्तव आढळले.

कांद्याला अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

कांद्याला तेलंगणामध्ये दोन हजार रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळत असल्याचा दावा करण्यात आला होता. राज्यातील शेतकऱ्यांनी तेलंगणातील बाजारपेठेत कांदा नेऊन विकावा, असे बीआरएसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होते.

हा दावा मात्र कांदा उत्पादकांनी खोडला आहे. श्री. वाणी व्हायरल व्हिडिओमध्ये सांगत आहे, की श्री.जाधव यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार ५०० गोणी कांदा हैद्राबादमध्ये विक्रीसाठी नेला होता. श्री. जाधव यांनी या बाजारात १ हजार ८०० ते २ हजार १००रुपये असा क्विंटलला दर मिळत असल्याचे म्हटले होते.

हैदराबादमध्ये आल्यानंतर कांद्याला ८०० ते १ हजार रुपये क्विंटलला दर मिळाला. तेथे कांदा आणण्यासाठी सुमारे तीन रुपये किलो वाहतूक खर्च झाला. तेथे ६ टक्के शेतकऱ्याकडून आडत घेतली जाते. सर्व खर्च जाऊन मला सुमारे ६०० ते ६५० रुपये क्विंटलला दर मिळाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Telangana Onion Rate
BRS Vs Congress: एकिकडे महाराष्ट्रात मोर्चेबांधणी सुरु असताना घरच्या अंगणात BRSला धक्का; १८ जणांचा रामराम

हैदराबादच्या ८०० किलोमीटर दूर बाजारात कांदा घेऊन गेल्यावर काही शेतकऱ्यांच्या पदरी चारशे रुपये क्विंटल असा भाव पडला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करतो, की कांदा तेलंगणा -हैदराबाद येथे न आणता महाराष्ट्रात विकावा असे श्री. वाणी यांनी व्हायरल व्हिडिओत म्हटले आहे.

ही घटना २४ जूनची आहे. याबाबत श्री. जाधव यांच्याशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांच्या कार्यालयाकडून प्रतिसाद मिळाला नाही.

'बीआरएस'चे कार्यकर्ते म्हणतात, ही राजकीय हेतूने चालली बदनामी

शेतकऱ्यांनी केलेला आरोप खोडण्यासाठी हर्षवर्धन जाधव हे स्वतः हैदराबाद बाजार समितीत गेले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

खोटी माहिती राजकीय हेतूने बनवून केवळ बदनामी पोटी अशा प्रकारचे खोटे व्हिडिओ बनवून जनमाणसांमध्ये एक वेगळी विरोधाची भूमिका निर्माण करण्याचा प्रकार आहे, असे 'बीआरएस'च्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Telangana Onion Rate
Kharif Season: कृषी पंढरीमध्ये सर्वदूर खरीपासाठीच्या पेरणीलायक पावसाची प्रतीक्षा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.